‘…तेव्हा लोकांना कळेल’; ऋतुराज सोबतच्या अफेअरच्या चर्चेवर सायलीचा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याने अलिकडंच पार पडलेल्या विजय हजारे सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने 7 बाॅलमध्ये 7 सिक्स मारत एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांनतर ऋतुराजच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला.

या खेळीनंतर पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड आणि अभिनेत्री सायली संजीव ( Sayali Sanjeev) यांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरु झाली. सायली हीचं नाव अनेकदा ऋतुराजशी जोडलं गेलं आहे. ऋतुराज गायकवाडने सायलीच्या एका फोटोवर कंमेट केली होती त्यानंतरचं त्यांच्या अफेरची चर्चा सुरु झाली होती.

यावरच सायलीने तिच्या एका मुलाखती (interviews) दरम्यान तिचं मत मांडलं आहे. या अफेरच्या अफवाबद्दल आणि गाॅसिपिंगमुळे वैयक्तिक आयुष्यावर खूप परिणाम होतात. तो एक चांगला खेळाडू आहे. सुरुवातीला याविषयी आमचं बोलणं देखील झालं होतं. त्यावेळी या अफवांवर लक्ष दिलं नाही.

‘चलो जानो दो’ असं करत त्या अफवांकडे (rumours) आम्ही दुर्लक्ष करत राहिलो. जेव्हा खरं समोर येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल असं आमचं म्हणणं होतं. जेव्हा आम्ही आमच्या जोडीदांरांशी लग्न करु तेव्हा सगळ्या लोकांना कळेल.

गेली दीड वर्षे झाली या अशा अफवा पसरत आहेत. यामुळे आमच्या मैत्रीवर (friendship) देखील परिणाम झाला आहे. आम्ही आता मित्र म्हणून देखील बोलू शकत नाही. मला कळत नाहीये की आमची एकमेकांशी नावं का जोडली गेली, असं मत सायलीने व्यक्त केलं आहे.

सायली संजीव हिच्या ‘शुममंगल सावधान’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकेला प्रेक्षकांनी (audience) चांगली पसंती दिली होती. सध्या तिच्या नुकताच आलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या