बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फुलराणी’ने घेतलं ‘कमळ’ हाती; दिल्ली विधानसभेचा करणार प्रचार

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैली झडतायेत. अशातच भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल दिल्ली विधानसभेसाठी प्रचार करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. दिल्लीत सायना नेहवालने आज हाती कमळ घेतलं आहे.

दिल्ली विधानसभेत काँग्रेस, आप आणि भाजप यांच्यातली लढत ही अतिशय महत्वाची मानली जाते. दिल्लीत आम आदमी पक्षाचं पारडं जड मानलं जात असतानाच आता सायनाच्या भाजपतल्या एन्ट्रीने चुरस निर्माण होईल. दिल्ली भाजपचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सायनाने आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते दिल्ली भाजपच्या मदतीला पुढे सरसावले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे प्रचारासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“…हे म्हणजे भुकेल्या लांडग्याने भक्ष्यावर झडप घालणं”

‘या’ मराठी अभिनेत्याला शरद पवार यांची भूमिका साकारायचीये!

महत्वाच्या बातम्या-

‘माझे पती विनाकारण देशासाठी शहीद झाले’; वीरपत्नीची खंत

फडणवीस सरकारने भीमा-कोरेगावचा हिंसाचार घडवून आणला; मलिकांचा खळबळजनक आरोप

शिस्तीत काम करा अन्यथा घरी जा; तुकाराम मुंडेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More