Top News पुणे महाराष्ट्र

संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं- भगतसिंह कोश्यारी

पुणे | संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं, असं राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. पुणे विद्यापीठात गुरू साहिब यामधील संत नामदेव या विशेष आवृत्तीचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.

राजा बदलले असतील राज्य लहान-मोठे बनले असतील, काही राज्यांचे तुकडेही झाले असतील. मात्र. देशाच्या हृदयातील आत्म्याचे तुकडे कधीच झाले नाहीत. याच संतांमुळं आपली संस्कृती आणि आत्मा जीवंत असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

संतांनी आपला देश वाचवला असं म्हणत संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं, असल्याचं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. आजकाल मीच गुरू, मीच महात्मा असं म्हणणारे स्वतःची पूजा करावी म्हणून धिंडोरे पीटत असल्याचं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनेकजण बोलतात मी फेसबुकशी जोडलो गेलोय. मात्र प्रत्यक्षात मी स्वतःचा कधी ‘फेस’ पाहिला नाही, तर मग ‘फेसबुक’ कधी पहायचो, असं म्हणत कोश्यारींनीसोशल मीडियावर वेळ घालवणाऱ्या मंडळींना संतांचे ही विचार अमलांत आणण्यासाठी वेळ खर्ची घालण्याचा सल्ला दिला.

थोडक्यात बातम्या- 

‘ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार’; फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री म्हणाले….

चांगली बातमी! राज्यातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त

“महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?”

‘मला तोंड फोडण्याची धमकी दिली होती आणि आता…’; कंगणाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या