बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दुबळयास घाबरतं ते सरकार वृत्तीने हुकूमशाही, पण मनाने दुर्बलच असतं”

मुंबई | फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमधून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. 84 वर्षांचा एक गलितगात्र देश उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?, असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

फादर स्टॅन यांना अंतिम समयी जामिनावर सोडावे अशी विनवणी अनेकांनी केली, पण हा 84 वर्षांचा आंधळा, बहिरा, गलितगात्र म्हातारा बाहेर आला तर राज्य व्यवस्थेस सुरुंग लावील असे ‘एनआयए’ वारंवार कोर्टात सांगत राहिले व आपली न्याय व्यवस्था स्टॅन स्वामींपेक्षा जास्त गलितगात्र होऊन त्या म्हाताऱ्याच्या तिरडीची व्यवस्था करत बसली, हेच सत्य आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

कश्मीरातील देशद्रोही, फुटीरतावादी गुपकार गँगशी पंधरा दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी चर्चा केली. या गँगला आजही कश्मीर स्वायत्त हवेच व 370 कलम तेथे पुन्हा लागू करा अशी मागणी कायम आहे. कश्मीरातील अतिरेकी दिल्लीत चर्चेला येतात व 84 वर्षांचे फादर स्टॅन स्वामी तुरुंगात तडफडून मरतात. देशाचे एकही न्यायालय स्टॅन स्वामी यांची साध्या जामिनावर सुटका करू शकले नाही. वृत्तपत्रांची मुस्कटदाबी होत आहे तशी न्याय व्यवस्थेचीही मुस्कटदाबी सुरू झाली आहे काय?, असा सवालही राऊतांनी विचारला.

जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी 84 वर्षांच्या स्टॅन स्वामींना जामीन द्यावा यासाठी विनंती केली. जर्मनीच्या मानवाधिकार आयुक्तांनी, संयुक्त राष्ट्रानेही विनवणी केली. पण पाण्याचा ग्लास उचलून तोंडासही लावू न शकणाऱ्या फादर स्वामींना शेवटी तुरुंगातच मारण्यात आलं. विनवण्या करून सरकारला पाझर फुटला नाही व फादर स्टॅन स्वामी तुरुंगातच मेले. हीच मुस्कटदाबी आहे. जे सरकार 84 वर्षांच्या अपंग, दुबळयास घाबरते ते सरकार वृत्तीने हुकूमशाही, पण मनाने दुर्बलच असतं. हिटलर-मुसोलिनी तसेच होते. मग ते सरकार कोणाचंही असो, असं सांगत राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत- बाळासाहेब थोरात

“देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता”

मंगलकार्यालयात बॉयफ्रेंडचं लग्न सुरु, बाबू- बाबू म्हणत गर्लफ्रेंडचा गेटवर आक्रोश

‘रोज एक कॉफी प्यायल्यास…’; संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

“राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं राजकारण पूर्ण होत नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More