मुंबई | मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन उभारा. यासाठी प्रकल्प आराखडा तयार करून वेगाने कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिलेत.
गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीचे कलादालन उभं करण्यात येणार आहे. या कलादालनाचे सादरीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज करण्यात आलं. यावेळी ते बोलतं होते.
ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलादालनाची उभारणी करताना त्यात नावीन्यपूर्ण अशा बाबींचा समावेश करण्यात यावा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, कलादालनाचा परिपूर्ण प्रकल्प आराखडा सादर करण्यात यावा असे निर्देश दिलेत.
दरम्यान, कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने आणि साधेपणाने करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.
थोडक्यात बातम्या-
हरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का!
कामाला लागा, पोलिसांना घरे बांधून द्या- उद्धव ठाकरे
महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; पेणमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या
सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते
कोरोनाला रोखण्यासाठी ‘सामना’तून शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला महत्वाचा सल्ला!