“फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात पडळकर तेवढंच काम करतात”
उस्मानाबाद | सांगली येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकांचं ड्रोनद्वारे पुष्पअर्पण करून लोकार्पण झालं असल्याचा दावा भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला होता. यावरून राष्ट्रवादी (NCP) युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांनी गोपीचंद पडळकरांवर टीकेची झोड उठवली आहे.
तुम्ही फडणवीसांच्या इशाऱ्यावर नाचत आहात. हा जो अनागोंदी कारभार चालू आहे, जी अराजकता माजली आहे ती केवळ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे, असा आरोप सक्षणा सलगर यांनी केला आहे. तर आमदारकी गोरगरिब धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी दिली आहे की भाजपचा अजेंडा चालवण्यासाठी, असा खोचक सवाल देखील सक्षणा सलगर यांनी उपस्थित केला आहे.
2 वर्षात तुम्ही एकदाही धनगर आरक्षणाविषयी बोलला नाहीत, ना त्यासाठी दिल्लीमध्ये प्रयत्न केले, अशी टीका सक्षणा सलगर यांनी केली आहे. तर फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात तेवढा कार्यक्रम करणे असं तुचं सुरू आहे, असा टोला देखील सक्षणा सलगर यांनी पडळकरांना लगावला आहे.
दरम्यान, पडळकरांच्या सोबतीला फक्त सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) असतात. पक्षाचं बाजूला ठेवू पण राम शिंदे (Ram Shinde) कुठे गेले?, महादेव जानकरांनाही (Mahadev Jankar) तुम्ही सोबत घेत नाहीत. तुम्ही ‘एकला चालो रे’ ची भूमिका घेत आहात. फक्त मीच जंगलात राज्य करणार अशी भूमिका असेल तर तो गैरसमज आहे, अशी टीका देखील सक्षणा सलगर यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
कार चालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, ‘हे’ नियम लवकरच लागू होणार
“भाजप सत्तेत असतानाच काश्मिरी पंडित बाहेर गेले”
IPL 2022! मिस्ट्री गर्लनं उडवलीय सर्वांची झोप, पाहा कोण आहे ‘ही’ तरुणी
Health ! काॅफी सेवनाचे आहेत ‘हे’ महत्त्वाचे फायदे
मोठी बातमी! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला, पाहा व्हिडीओ
Comments are closed.