मुंबई | राज्यातील युवती व तरूणींच्या आरोग्य प्रश्नावर अधिक लक्ष देण्याची व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर यांनी राज्यातील युवतींच्यावतीने राज्याच्या महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर यांची नुकतीच विधानभवनात भेट घेतली.
महिला व बालकल्याण मंत्र्यांची भेट घेत राज्यातील शासकीय शाळेत सर्व विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही सक्षणा सलगर यांनी केली.
आज स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महिलांना अॅनिमिया, ब्रेस्ट कॅन्सर, एचबी कमतरता असते. अशावेळी त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने एक सक्षम पाऊल उचलण्यात यावे. महाराष्ट्र राज्याने ग्रामीण भागातील मुलींच्या आरोग्यासाठी धाडसी पाऊल उचलावे, अशी विनंतीही सलगर यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, राज्यातील पदाधिकारी दिव्या भोसले, कल्पिता पाटील, अश्विनी बांगर, स्नेहल शिंगारे, श्रेया भोसले, पूजा लाड उपस्थित होत्या.
ट्रेंडिंग बातम्या-
भारतात 11 रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा
राष्ट्रवादी सोडल्यापासून उदयनराजेंच्या संपत्तीत इतकी घट!
महत्वाच्या बातम्या-
‘महापुरुषांचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता’; निलेश साबळेने मागितली माफी
“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवा”
अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली!
Comments are closed.