पुणे महाराष्ट्र

पवार साहेब एवढे ह्रदयात होते तर मग प्रेमभंग का केला??- सक्षणा सलगर

पुणे |  मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. यावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी जोरदार टीका केली आहे.

सचिन अहिर यांच्या शरद पवार एवढेच जर ह्रदयात होते तर मग त्यांनी असा प्रेमभंग का केला? असा सवाल करत स्वत:च्या स्वार्थापायी आणि सत्तेच्या हव्यासापोटी अहिर शिवसेनेत गेले आहेत, अशी जोरदार टीका सलगर यांनी केली आहे.

मी राष्ट्रवादी तोडण्याचं काम कधी करणार नाही. तर शिवसेना वाढवण्याचं काम करेल. राष्ट्रवादी सोडली असली तरी शरद पवार साहेब माझ्या ह्र्दयात असतील तर उद्धव आणि आदित्य यांचं बळ अंगात असेल, अशा भावना सचिन अहिर यांनी पक्ष सोडताना व्यक्त केल्या होत्या.

‘बहेती गंगा में हात धोना’ अशा प्रकारचं काम सध्या चालू आहे. जे नेते पक्षाने एवढं देऊनही पक्ष सोडतात त्यांच्याविषयी काय बोलायचं?? सत्तेशिवाय ते राहू शकत नाही. शिवसेनेकडे सक्षम नेतृत्व नाही. म्हणूनच ते शरद पवार साहेबांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात घेत आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

खऱ्या शिवसेनेला संपवण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. त्यांनी हे मान्य केलंय की शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली खमके नेते आपल्या पक्षात घेतल्या शिवाय आपला पक्ष तयार होऊ शकत नाही, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या विचारांचा झंझावात उभा करेल आणि सत्तापिपासू लोकांना दूर कसं ठेवता येईल याचा विचार करेल, असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

-आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

“शरद पवार माझ्या हृदयात तर उद्धव-आदित्यचं बळ माझ्या शरीरात”

-अहिरांनी राष्ट्रवादी सोडली अन् पक्षाने लगोलग या नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड केली!

-“शरद पवार शिवसेनेत येतील असं वाटत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या