पैशांसाठी ते नग्न होऊन नाचण्यासही तयार होतील- साक्षी महाराज

नवी दिल्ली | ‘पद्मावती’ सिनेमावरुन सुरु असलेल्या वादात आता भाजप खासदार साक्षी महाराज यांनीही उडी घेतलीय.  सिनेसृष्टीतील लोकांना अस्मिता आणि राष्ट्रवादीशी देणंघेणं नाही. ते पैशांसाठी नग्न होऊन नाचण्यासही तयार होतील, असं साक्षी महाराज यांनी म्हटलंय. 

संजय लिला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावती’ सिनेमा 1 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. मात्र हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीचा त्याला होणारा विरोध वाढताना दिसतोय. 

दरम्यान, सिनेमात राणी पद्मावतीची बदनामी करण्यात आलेली नाही. तिचं शौर्य आणि बलिदान या सिनेमात दाखवण्यात आलंय, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं संजय लिला बन्साळी यांनी आपल्या फेसबुक वॉलवर लिहिलंय.