बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधून बाहेर, साक्षी धोनीने लिहिली भावनिक पोस्ट

नवी दिल्ली | 3 वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला यंदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाहीये. प्ले ऑफमध्ये चेन्नईचा समावेश नाही असं इतिहासात पहिल्यांदा घडलंय. यानंतर महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने एक भावनिक पोस्ट शेअर केलीये.

साक्षी तिच्या पोस्टमध्ये लिहिते, हा फक्त खेळ आहे… तुम्ही कधी जिंकता, तर कधी हरता. गेले अनेक वर्ष तुम्ही चाहत्यांना आनंददायी क्षण अनुभवण्यास दिलेत, तसंच काही पराभवंही पत्करले आहेत. काही वेळा जिंकलात, काही वेळा हरलात आणि काही वेळा संधी चुकलात… हा फक्त खेळ आहे…!

साक्षी पुढे लिहिते, उपदेश देणारे बरेच लोकं आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया देखील वेगळ्या असतील. फक्त तुमच्या भावनांना खिलाडूवृत्तीच्या मध्ये आणू नका…हा फक्त खेळ आहे.”

चेन्नईला यंदाच्या वर्षी प्ले ऑफमध्ये प्रवेश करता न आल्याने संघावर तसंच धोनीवर सोशल मिडियावर फार टीका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पोस्टद्वारे साक्षीने खेळाडूंचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केलाय.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे… सरकार पडणार असून हे शरद पवारांनाही माहीत आहे”

‘…तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल’; दिशा सालियान प्रकरणाचा धागा पकडत राणेंची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना 100 पत्र; मात्र उद्धव ठाकरेंकडून एकाचंही उत्तर नाही!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण!

‘मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी’; कंगणा राणावतचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More