बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

12 तास काम करूनही पगार मिळणार कमी; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली | कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोनाच्या दोन्ही लाटेत 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याची आकडेवारी समोर आली होती. तर कोरोनाच्या थैमानामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला आहे. किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. त्यातच आता केंद्र सरकार कामगारांवर कामाचा बोजा वाढवणार असल्याचं समोर येत आहे.

नवीन ड्राफ्ट कायद्यानुसार कामकाजाची वेळ 12 तास करण्याचा प्रस्ताव आहे. नियमानुसार 15 ते 20 मिनिटांच्या अतिरिक्त कामाला 30 मिनिटांच्या ओव्हरटाइममध्ये समाविष्ट करण्याची तरतूद आहे. सध्या 30 मिनिटांपेक्षा कमी अतिरिक्त वेळेला ओव्हरटाइम मानलं जात नाही. ड्राफ्ट नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला सलग 5 तास काम करता येणार नाही, कर्मचाऱ्यांना दर पाच तासांनी अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा लागेल.

नवीन मसुद्याच्या नियमानुसार मूलभूत वेतन एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावं, असा प्रस्ताव केंद्राचा आहे. यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना बदलली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाती येणारा पगार कमी होऊ शकतो आणि पीएफची रक्कम मात्र वाढणार आहे. मोदी सरकार लेबर कोडचे नियम लवकरात लवकर लागू करायच्या विचारात आहे.

दरम्यान, आधीही काही भाजपशासीत राज्यात कामगार कायद्यांना डच्चू देण्यात आला आहे. कामगार कायदे रद्द केल्यानंतर भाजप सरकारवर कडाडून टीका करण्यात आली होती. एकीकडे लोक आर्थिकदृषट्या अडचणीत असताना लोकांना आणखी अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

थोडक्यात बातम्या-

“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीनं सांगितला गेम प्लॅन, म्हणाला…

“पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय”

‘SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा’; MPSC चं मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी परिपत्रक

मुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात दोन तास बैठक; 11 पैकी ‘या’ 6 मागण्या ठाकरे सरकारला मान्य

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More