बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक!; अवघ्या चार ते पाच हजार रुपयात कोरोनाच्या बनावट अहवालाची विक्री

मुंबई | राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 13 हजारांवर पोहचली आहे. तर पुणे आणि मुंबई सारख्या शहरात रूग्णसंख्या हजारोंच्यावर पोहचली आहे. कोरोना नियमावलीचे पालन लोक करत नसल्याने रूग्णसंख्येत नव्याने वाढ होत आहे. त्याच बरोबर आता बनावट कोरोना अहवालची विक्री होताना देखील दिसत आहे.

खार परिसरातील दाम्पत्याला जयपूरला जायचे होते. त्यासाठी त्यांनी खार येथील थायरोकेअर शाखेत त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता मात्र त्यांनी तयार करून घेतलेला बनावट अहवाल पालिकेला पाठवला आणि जयपूरला जाण्यासाठी निघाले. डाॅक्टरांच्या केलेल्या तक्रारीवरून या दाम्पत्यांवर कारवाई केली आहे.

गोवंडेतील सर्व्हिस प्रोव्हायडर अब्दूल साजिद खान हा अधिकृत कोरोना अहवालाच्या जागी बनावट अहवाल तयार करून देत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर थायरोकेअरचे लीगल एक्झिक्यूटीव बिरूदेव सरवदे यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांकडून दाम्पत्यांना अटक करण्यात आली आहे.

सर्व्हिस प्रोव्हायडर अब्दूल साजिद खान हा थायरोकेअर लॅबचे बनावट लेटरहेड आणि स्टँपचा वापर करून बनावट अहवाल 4 ते 5 हजारात विकत होता. आणखी किती लोकांना अब्दूलने बनावट अहवाल पुरवले आहेत? याची चौकशी याबद्दल पोलिस करत आहेत. याआधी अशा प्रकारचे बनावट अहवाल प्रकरणी पुण्यात देखील एकाला अटक झाली होती.

थोडक्यात बातम्या-

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; ‘या’ तारखेपासून होणार पगारवाढ?

ममता बॅनर्जींवरील हल्ल्याला वेगळं वळण; प्रत्यक्षदर्शीनं केला ‘हा’ मोठा खुलासा

आता लग्नाला फक्त 20 लोकांनाच परवानगी; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध लागू!

महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धार्मिक ठिकाणी संचारबंदी; गुलाल उधळणे, पेढे वाटण्यास सक्त मनाई

शरद पवार-विश्वास नांगरे पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण; ‘या’ विषयावर झाली चर्चा?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More