बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात थेट फेसबुकवरून दारूची विक्री; सापळा रचून आरोपीला अटक

पुणे | मागील वर्षी कोरोनामुळे सर्व दुकानं बंद करण्यात आली होती. काही महिन्यांनंतर दारूची दुकानं उघडण्यात आली. त्यानंतर मद्यप्रेमींनी दुकानाबाहेर प्रचंड गर्दी केली. आता देखील तिच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यात लावल्या गेलेल्या कडक लाॅकडाऊनमुळे दारूची दुकानं बंद करण्यात आली आहे. पण त्यामुळे आता तळीरामांची चंगळ होताना दिसत आहे. असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे.

पुण्यातील हडपसर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. राजीव अग्रवाल नावाच्या एका व्यक्तीने दारूची विक्री करण्यासाठी थेट फेसबुकचा वापर केला आहे. त्याने फेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकून आपली जाहिरातबाजीही केली आहे. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी सापळा रचून आरोपी युवकाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दारूच्या काही बाटल्यांसहित अन्य वस्तूंचा साठाही जप्त केला आहे. संबंधित आरोपी विरोधात मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील हडपसर परिसरात फेसबुकच्या माध्यमातून दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर संबंधित जाहिरात कोणी दिली, याची खातरजमा करून जाहिरातीत दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला आणि दारुची पाहिजे असल्याचं आम्ही सांगितलं. त्यानंतर समोरील व्यक्तीनं हडपसर परिसरातील गाडीतळ याठिकाणी दारु देतोय असं सांगितलं होतं, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राजीव अग्रवालकडून 28 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी राजीव अग्रवाल हा 180 मिलिलिटरची बाटली फेसबुकच्या माध्यमातून दुप्पट दराने विकत होता. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकार ‘या’ जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत; आरोग्य मंत्रालयाचा प्रस्ताव

…म्हणून त्यावेळी थांबवला होता दिल्ली आणि बंगळूरूचा आयपीएल सामना

कोल्हापूरात विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यावर वाहन जप्त होणार; कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई

धोका वाढला! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, जाणुन घ्या मागच्या 24 तासातील आकडेवारी

‘खूपच घाई असेल तर प्रश्न पाठवा उत्तरं देते’; रश्मी शुक्ला यांचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More