बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! दहशतवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरलं

श्रीनगर | गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कश्मिरी पंडितांना लक्ष्य करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जानेवारी महिन्यापासून 25 काश्मिरी नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी 24 तासात दुसरी हत्या केल्याने कश्मिरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कश्मिरी पंडिताच्या दुकानात काम करणाऱ्या एका सेल्समॅनची हत्या करण्यात आली. बंदिपुरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रात्री 8च्या सुमारास मोहम्मद इब्राहिम या सेल्समॅनला गोळी मारली. हा हल्ला झाल्यानंतर त्यांना रूग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या परिसरात नाकाबंदी केली. तर या प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जम्मू काश्मिर पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत कश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे कश्मिरी पंडित पुन्हा स्थलांतराचा पर्याय निवडत आहेत.

मागील महिन्यात दहशतवाद्यांनी 13 कश्मिरी नागरिकांची निघृण हत्या केली आहे. या 13 जणांत शाळेतील शिक्षक, व्यावसायिक आणि कामगारांचाही समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 12 जवान शहिद झाले आहेत. तर 20 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“पोलिसांना कलेक्शनसाठी वापरता मग ड्रग्ज रोखण्यासाठी का वापरत नाहीत?”

“पडळकरांच्या जिवाला काही झाल्यास राष्ट्रवादीचे नेते जबाबदार असतील”

“तेच मी माझ्या बंधूंना गेली कित्येक दिवस सांगतोय की…”

“एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा अन्यथा…”

राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ माजी आमदाराची भाजपमध्ये एन्ट्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More