“जिच्यामुळे वाद झाले, तिला तिसराच..”; सलमान-विवेकच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन

Salman Khan | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय एकेकाळी नात्यात होते. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या काही काळ विवेक सोबत नात्यात होती. यामुळे विवेक आणि सलमानचं जोरदार भांडण सुद्धा झालं होतं. मात्र ऐश्वर्याने विवेक आणि सलमान या दोघांनाही नाकारत अभिषेक बच्चनशी संसार थाटला.

सलमान खान आणि विवेक या दोघांमध्ये बरेच दिवस वाद होते. अखेर त्यांच्या भांडणाबाबत सलमानचे वडील सलीम खान यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या राय, सलमान खान आणि विवेक ओबेरॉय चर्चेत आले आहेत.

नेमकं काय म्हणाले सलीम खान?

“आयुष्यात काही क्षण आणि काही विषय हे भावनात्मक असतात. त्यावर कोणतंही समाधान नसतं. सलमान आणि विवेक दोघेही त्यावेळी अतिशय भावनात्मक होते. दोघांना नंतर जाणीव होईल की, कोणताच अर्थ नसलेल्या गोष्टीवर त्यांचे वाद झाले आहेत. दोघांमध्ये जिच्यामुळे वाद झाले, तिला तर तिसराच घेऊन गेला आणि दोघे तिथेच राहिले.”, असं सलीम खान म्हणाले आहेत.

इतकंच नाही तर पुढे सलमानच्या (Salman Khan) लग्नाबाबतही सलीम खान यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. 2009 नंतर तुझ्या आयुष्यात खूप बदल होतील, असं सलीम खान म्हणाले होते. 2009 नंतर सलमानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. पुढच्या एक दोन वर्षात  सलमान याचं लग्न झालं तर होईल. असं नाही झालं तर, त्याच्या लग्नाच्या शक्यता फार कमी आहे, असंही सलीम खान म्हणाले होते.

सलमानचा आगामी चित्रपट

सलमानबाबतची (Salman Khan) ही गोष्ट खरी ठरली. 2009 नंतर सलमानचे अनेक चित्रपट हीट ठरले. यावेळी सलमान फेमस तर झाला. पण, तो अजूनही सिंगल आयुष्यच जगत आहे. वयाच्या 58 व्या वर्षी देखील अभिनेता एकटा आयुष्य जगत आहे. सलमानने आता पर्यंत खूप अभिनेत्रींना डेट केलं आहे.

अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्यापर्यंत सलमानने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. मात्र, तो अजूनही लग्न बंधनात अडकला नाहीये. दरम्यान, सलमानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास लवकरच तो ‘सिंकदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

News Title –  Salim Khan reaction On Salman khan and Vivek Fight

महत्त्वाच्या बातम्या-

MS धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनी अजून एक वर्ष..

एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्ती संदर्भात मोठी अपडेट; जाणून घ्या धोनी CSK ला कधी निरोप देणार?

दुःखद घटना; राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

फोर्ड कंपनी बाजारात धुमाकूळ घालणार; नवीन SUV कारची एंट्री

महत्वाची बातमी! हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट