अमरनाथ हल्ल्यातील यात्रेकरुंसाठी सलीम शेख ठरला देवदूत

वलसाड | अमरनाथ हल्ल्यातील पर्यटकांसाठी बसचालक सलीम शेख देवदूत ठरला. कारण दहशतवाद्यांनी हल्ला चढवल्यानंतरही सलीमने बस सुसाट वेगाने मिल्ट्री कॅम्पपर्यंत आणली, त्यामुळे अनेक यात्रेकरुंचे प्राण वाचले.

हल्ला झाला त्यावेळी बस अमरनाथ यात्रा करुन परतत होती. दहशतवाद्यांनी डाव साधून गोळीबार केला. त्यावेळी बसमध्ये ५६ यात्रेकरु होते. यापैकी ७ जणांचा गोळीबारात मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झालेत.

दरम्यान, सलीमच्या या धाडसाचं जगभरातून कौतुक होतंय.