बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ना रोहित, ना विराट बॉलिवूडचा भाईजान ‘या’ दोन खेळाडूंचा झालाय जबरा फॅन!

मुंबई | आयपीएलचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरू आहे. कोलकाता संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अंतिम सामन्याअगोदर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान स्टार स्पोर्टसवर आला होता. त्यावेळी बोलताना सलमान खानने यंदाच्या आयपीएलमधील आपल्या आवडत्या दोन खेळाडूंची नाव सांगितली आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाज आवेश खान यांची नाव घेतली. ऋतुराजने यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा काढत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली आहे. ऋतुराजने चेन्नईच्या संघाला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे त्यानंतर संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश आलं.

यंदाच्या आयपीएलमध्ये 600 धावांचा टप्पा ओलांडणारा ऋतुराज गायकवाड के.एल. राहुलनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. आवेश खाननेही चमकदार कामगिरी केली आहे. यंदाच्या मोसमात दिल्लीकडून आवेश खानने 24 गडी बाद केले आहेत. यामध्ये 13 धावांमध्ये 3 गडी बाद ही आवेशची यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात सध्या चेन्नईने 1 गडी गमावत 113 धावा केल्या आहेत. फाफ वैयक्तिक 56 धावांवर खेळत असून रॉबिन उथप्पा 25 धावांवर खेळत आहे. चेन्नई कोलकाता संघाला किती धावांचं लक्ष्य  देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मै तो फकीर हूं असे दरिद्री विचार आमचे नाहीत”

“महाराष्ट्रात लोकशाहीचा खून तर यूपीत काय लोकशाहीचा मळा फुलला आहे का?”

“जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात”

“शब्द जपून वापरतोय नाहीतर फाडायला काही वेळ लागत नाही”

“सावरकर-गांधी शब्द उच्चारण्याची तुमची लायकी नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More