‘बिग बाॅस’च्या निर्मात्यांना मिळाला नवा होस्ट?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | ‘बिग बाॅस’ (Big Boss) म्हटलं की सगळ्याच गोष्टी अनाकलनीय असतात. या घरात मैत्री सोबतच शत्रूत्व पहायला मिळतंय. दिवसेंदिवस शो जसा पुढे सरकतो तसतसा स्पर्धकांचा खरा चेहरा समोर यायला लागतो.

या शोचं सूत्रसंचालन बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) करतोय. मात्र हा शो सुरु होण्यापूर्वी या शोचा करार करावा लागतो. तसेच इथे राहणाऱ्या स्पर्धक आणि सूत्रसंचालकासोबत 105 दिवसांचा करार केला जातो. आणि केलेल्या करारासाठी स्पर्धक आणि सूत्रसंचालकाला 105 दिवसांत शोसाठी वेळ देणं बंधनकारक असतं.

वाढत्या टीआरपीमुळे आणि बिग बाॅसच्या लोकप्रियतेमुळे या वेळेसचा हा सिझन चार आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आला आहे. आणि म्हणून हा सिझन जानेवारी महिन्यात संपणार नसून फेब्रुवारीच्या 12 तारखेला प्रक्षकांचा निरोप घेणार आहे.

या शोचं सूत्रसंचालन सलमान खान करत असला तरी आता त्याला हे बंद करावं लागणार आहे. कारण करार केल्याप्रमाणे सलमान खान त्याचा अधिक वेळ या शोला देऊ शकत नसल्याचं कळतंय.

चित्रपटांच्या शूटिंगमुळे तो काही दिवस सूत्रसंचालन करू शकणार नाही. याच कारणामुळे शोमध्ये काही दिवस सलमानची जागा दुसरी सेलिब्रिटी घेणार आहे. मात्र बिग बॉसचा ग्रँड फिनाले होस्ट करण्यासाठी सलमान पुन्हा एकदा मंचावर येणार आहे. तोपर्यंत त्याची जागी कोण घेतं आहे? या कडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मासिक पाळीमध्ये ब्रेस्ट पेन होत असेल तर आताच व्हा सावध!

सुशांतच्या घरातील ‘या’ जवळच्या सदस्याचं निधन!

कपडे बॅगेत भरून ‘हा’ आमदार एसीबी चौकशीसाठी रवाना!

शिंदेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात आणणार तब्बल ‘इतक्या’ कोटी रूपयांची गुंतवणूक

धनुष्यबाण कोणाचा? यावर निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी