Salman Khan & Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही नेहमी तिच्या नात्याला घेऊन चर्चेत असते. अनेक वर्षांआधी अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्यातील नातेसंबंधाबाबत चर्चा होत्या. या चर्चा आजही होताना दिसतात. सलमानने विवाह न करण्याचं कारण ऐश्वर्या, कतरिना अशा इतर अनेक अभिनेत्री आहेत. मात्र सलमानचं सर्वाधिक नाव हे ऐश्वर्यासोबत जोडलं गेलं आहे. अशातच ऐश्वर्या आणि सलमानच्या एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एक किस्सा घडला होता. तेव्हा सलमान खान हा दिग्दर्शकावर चांगलाच भडकला होता. (Salman Khan & Aishwarya Rai)
ऐश्वर्याला स्पर्श केल्याने सलमान चिडला
‘हम दिल दे चुके’ या सिनेमामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्याने स्क्रिन शेअर केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे संजय लिला भंसाळी होते. त्यावेळी सलमान खान आणि ऐश्वर्याचा सीन शूटींग करत असताना दिग्दर्शक ऐश्वर्याला हात लावून सीन समजावून सांगत होते. मात्र ऐश्वर्याला हात लावल्याने सलमान खानने संताप व्यक्त केला. याबाबतची माहिती हम दिल दे चुके सनम चित्रपटातील ऐश्वर्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या स्मिता जयकर यांनी याबद्दल खुलासा केला.(Salman Khan & Aishwarya Rai)
स्मिता जयकर यांनी केला खुलासा
आंखो की गुस्ताखियां गाण्यातील एक सीन आठवत आहे. सलमान ऐश्वर्याला शोधण्यासाठी फिरत असतो. तेव्हा ऐश्वर्या माझ्या बाजूला येऊन उभी राहते. तेव्हा संजय भंसाळी जवळ आले आणि ऐश्वर्याला स्पर्श करत सीन समजून सांगू लागले. तेव्हा सलमान संजय भंसाळी यांना म्हणाला की सर तुम्ही ऐश्वर्याला स्पर्श का केलात? (Salman Khan
तेव्हापासून ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याबाबत चर्चा होऊ लागली होती. याचा सिनेमाला फायदा देखील झाला होता. दोघांच्या डोळ्यामध्ये ऐकमेकांबाबतचं प्रेम दिसत होतं, असं स्मिता जयकर म्हणाल्या. मात्र सलमान आणि ऐश्वर्याचं नात हे फार काळ टीकलं नाही. (Salman Khan & Aishwarya Rai)
ऐश्वर्या आणि सलमानमध्ये खटके उडाले. ऐश्वर्याने सलमानवर अनेक गंभीर आरोप केले होते. यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. ते विभक्त झाले. ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत विवाह केला. तिला आराध्या नावाची एक मुलगी आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत सुखी आहे.
तर सलमान खानने आपल्या वयाची पन्नाशी ओलांडली असून त्याने विवाह न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनेकदा आपल्या विवाहाबाबत प्रश्न केले जातात. तो त्याकडे फार गांभिर्याने लक्ष देत नाही.
News Title – Salman Khan & Aishwarya Rai Coincidence Between Hum Dil de Chuke Sanam Movie Shooting
महत्त्वाच्या बातम्या
“आता सभा घेऊन कोणाची पोरं खेळवणार?”
“आमच्या डोक्यात प्रकाश पडायला…”, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला, शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी जाहीर
सर्वात मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने केली आत्महत्या
अखेर ठरलं, ठाण्यात एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का लढणार निवडणूक!