Salman Khan | बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल अजूनही चर्चा होत असते. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सलमान आणि ऐश्वर्या काही कारणांमुळे वेगळे झाले.त्यांची जोडी तेव्हा प्रचंड फेमस होती. लवकरच ते दोघे लग्न करतील, अशा चर्चा तेव्हा व्हायच्या. मात्र, त्यांच्या दोघांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.
भांडण झाल्यानंतर ऐश्वर्या सलमान पासून वेगळी झाली. पुढे काही काळ तिचं नाव अभिनेता विवेक ओबेरॉय सोबतही जोडलं गेलं. यामुळे विवेक आणि सलमानचे झालेले वाद तर प्रचलित आहेत. मात्र, ऐश्वर्याने आयुष्यभराच्या साथीसाठी तिसऱ्याचीच निवड केली.तिने अभिषेक बच्चन सोबत लग्न करत संसार थाटला. तर, सलमान अजूनही सिंगल आयुष्य जगत आहे.
“जुन्या आठवणी विसरणं माझ्यासाठी..”
एका मुलाखतीमध्ये सलमानने ऐश्वर्या हिचं नाव न घेता मोठं वक्तव्य केलं होतं. ‘माझ्या एक्सगर्लफ्रेंडने जोडीदार म्हणून उत्तम व्यक्तीची निवड केली आहे. झालेल्या गोष्टींना फार काळ झाला आहे. मला असं वाटतं जुन्या आठवणींमध्ये रमण्यात काहीही अर्थ नाही. जुन्या आठवणी विसरणं माझ्यासाठी चांगलं आहे. ’, असं सलमान म्हणाला होता.
‘ती व्यक्ती जर आनंदी आहे तर, तुम्हाला देखील आनंदी राहाता यायला हवं.’, असंही यावेळी सलमान म्हणाला होता. याच मुलाखतीमध्ये सलमानने अभिषेक बच्चनचं देखील कौतुक केलं होतं. “अभिषेक एक उत्तम व्यक्ती आहे. ती त्याच्यासोबत आनंदी आहे. तिचं लग्न एका मोठ्या कुटुंबात झालं आहे.”, असं सलमान (Salman Khan) म्हणाला होता.
“जोडीदार म्हणून तिने एका…”
तसंच ब्रेकअप झालं म्हणून सर्वकाही संपलं असं काहीही नसतं… असं देखील सलमान खान म्हणाला होता. सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान खूप प्रेम बहरत गेलं. मात्र, नंतर झालेलं त्यांच्यातील भांडण इतकं तीव्र होतं की त्याचा शेवट झाला. ऐश्वर्या आता सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. तर, सलमान (Salman Khan) अजूनही एकटा आयुष्य जगतोय.
सलमानने आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींना डेट केलंय. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्यापर्यंत सलमानने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. मात्र, तो अजूनही लग्न बंधनात अडकला नाहीये. दरम्यान, सलमानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास लवकरच तो ‘सिंकदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
News Title- Salman Khan Aishwarya Rai Relationship
महत्वाच्या बातम्या-
“नवऱ्याने एकनाथ शिंदेंसोबत जाऊन त्यांना सलाम ठोकणं मला अजिबात पटलं नाही”
पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा!
कॅटरिना कैफने दिली गुड न्यूज?; बेबी बंप लपवतानाचा नवा Video समोर