Salman Khan | ‘हम दिल दे चुके सनम’, चित्रपटाची आजही चर्चा आहे. अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी सिनेमामध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लिला भन्साळी यांनी केलं होतं. त्यावेळी सलमान खान आणि ऐश्वर्याच्या प्रेमाची चर्चा सुरू होती. त्या कारणाने चित्रपटाला प्रसिद्धी मिळाली होती. मात्र आता या चित्रपटानंतर सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा भन्साळी यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे.
‘हिरामंडी’ या भन्साळींच्या वेब सीरिजच्या प्रीमिअरदरम्यान दोघांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिले. यामुळे आता पुन्हा एकदा हम दिल दे चुके सनम चित्रपटाची चर्चा सुरू झालीये. दरम्यान, य चित्रपटाच्या सेटवर सलमानने (Salman Khan) ऐश्वर्या राय नाहीतर दुसऱ्या मुलीला लग्नाची मागणी घातली होती. ती दुसरी तिसरी कोणीही नसून भन्साळीची भाची होती.
तु माझ्याशी लग्न करशील का?
भन्साळीची भाची शर्मिन सहगल असं तिचं नाव असून ती सतत भन्साळीसोबत चित्रपटाच्या सेटवर यायची. तेव्हा शर्मिन तीन-चार वर्षांची होती. तेव्हा सलमानने तिला चेष्टा करत विचारलं होतं की तु माझ्याशी लग्न करशील का? तेव्हा तिनं नकार दिला. तिच शर्मिन आता मोठी झाली आहे. ‘हिरामंडी’ सीरिजमध्ये काम करताना दिसतेय.
शर्मिन सलमानची (Salman Khan) मोठी चाहती आहे ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातील सलमानचं काम पाहून ती खूप खूश झाली. तिनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील सलमानचं (Salman Khan) काम आवडल्याचं मुलाखतीत सांगितलं आहे.
View this post on Instagram
शर्मिलने सांगितला प्रपोजलचा किस्सा
या मुलाखतीत सलमानच्या प्रपोजलचा किस्सा सांगितला होता. त्यावेळी मी लहान होते. मला लग्नाच्या संकल्पनेविषयी फारशी माहिती नव्हती. प्रत्येक गोष्टींसाठी एकच उत्तर असायचं, ते म्हणजे ‘नाही’ त्यामुळे सलमान सरांनाही मी त्यावेळी थेट नाहीच म्हणाले होते.
शर्मिनने बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या सहायक दिग्दर्शन म्हणून काम केलं होतं. तिनं 2019 मध्ये तिने ‘मलाल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटासाठी ‘बेस्ट फिमेल डेब्यु’चा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
News Title – Salman Khan Asked Sanjay Leela Bhansali Niece Sharmin To Marry Him During Hum Dil de Chuke Sanam
महत्त्वाच्या बातम्या
मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…
काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात; या दोन गोष्टींमुळे गांधींचं पारडं जड राहणार
धक्कादायक… ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला
या राशीच्या व्यक्तींनी सावधान; मित्रांशी मतभेदाची शक्यता
विखेंच्या कार्यकर्त्यांनी खोटा संदेश सोशल मीडियात व्हायरल केला, अण्णांच्या भूमिकेमुळे विखे संकटात!