‘….म्हणून मी या अभिनेत्रीला सुरक्षा देतो’; सलमानच्या बाॅडीगार्डचा मोठा खुलासा

Salman Khan | बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतो. आपल्या पर्सनल लाईफ बरोबरच आपल्या प्रोफेशनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते कायमच उत्सुक असतात. काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या बंगल्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. दरम्यान सध्या चर्चा आहे ती, सलमान खानच्या बाॅडीगार्डची.

सलमान खानचा (Salman Khan) कायम चर्चेत असणारा बाॅडीगार्ड शेरा सतत सलमानसोबत अनेक कार्यक्रमात त्याच्या आजूबाजूला सिक्यूरिटी देत असतो. इंडस्ट्रीमध्ये हाय पेड बाॅडीगार्ड म्हणून शेराची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेरा बाॅलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला सिक्यूरिटी देत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

कोण आहे ही अभिनेत्री?

सलमान (Salman Khan) खानचा बाॅडीगार्ड शेरा हा गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री कतरिनाला सिक्युरिटी देत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये बोलत असताना शेरा म्हणाला की, मी फक्त सलमानलाच नाही तर, हृतिक रोशन, करीना कपूर आणि कतरिना यांना सुरक्षा देत असतो. मात्र, यांना तो का सुरक्षा देतो? या मागचं कारण देखील शेराने सांगितलं.

काय म्हणाला शेरा?

बोलत असताना शेराला सलमान खानच्या एकनिष्ठ असण्यावरुन प्रश्न विचारला असताना, शेरा म्हणाला की, मी आज कतरिना, करीना किंवा हृतिक यांच्यासोबत दिसलो असेल तर ते फक्त सलमान खानमुळेच दिसलो. मी इतर कलाकारांसोबत दिसलो आहे, अन्यथा माझी निष्ठा फक्त माझ्या भावाप्रती आहे आणि ती कायम तशीच राहील’ असं उत्तर शेराने दिले आहे.

News Title : Salman Khan bodyguard reveals the truth

महत्त्वाच्या बातम्या-

महायुतीचं टेंशन वाढलं?; शिंदे आणि अजितदादा गटाला मोठं खिंडार

सोलापुरात राजकीय भूकंप, शिंदे व अजितदादा गटाचे दोन बडे नेते महाविकास आघाडीत

गणेश चतुर्थीला राशीनुसार करा हे उपाय, होईल मनातील इच्छा पूर्ण

भारतात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये शाहरुख खान अव्वल, आकडा ऐकून थक्क व्हाल

निवडणुकीआधीच भाजपला मोठे झटके; यादी जाहीर होताच राजीनाम्याची लाट