मुंबई | कृषी कायद्याविरोधात गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. यावर देशातील अनेक दिग्गज अभिनेत्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शेतकऱ्यांच्या आंदोलनवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मी नक्कीच यासंदर्भात भाष्य करेल, सर्वांसोबत जे योग्य आहे ते व्हायलाच हवं, बरोबर ते बरोबर व्हावं, असं सलमान खानने म्हटलं आहे.
4 फेब्रुवारी सलमान खान मुंबईतील एका म्युझिक शोच्या लाँचिंगसाठी आला होता, त्यावेळी मीडियाशी बोलताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सलमानला प्रश्न विचारण्यात आला.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तिच्यापाठोपाठ मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही आपलं परखड मत मांडलं आहे.
थोडक्यात बातम्या-
रात्री गावी जाण्याची सोय नव्हती; तरुणांनी केलेल्या प्रकारानं एसटी महामंडळाची झोप उडाली!
…ही सवय आता बदलली पाहिजे; ज्योतिरादित्य शिंदेंची शरद पवारांवर जोरदार टीका
आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज- उद्धव ठाकरे
“शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सचिन तेंडुलकरचा ‘भारतरत्न’ काढून घ्या”
चुलता पंतप्रधान असताना भाजपनं पुतणीला तिकीट नाकारलं, वाचा सविस्तर!
Comments are closed.