Salman Khan | बॉलीवुड अभिनेता सलमान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र, ऐश्वर्यासोबत त्याच्या नात्याच्या चर्चा अजूनही होत असते. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सलमान खान आणि ऐश्वर्या राय नंतर काही कारणांमुळे वेगळे झाले. त्यांची जोडी तेव्हा प्रचंड फेमस होती. लवकरच ते दोघे लग्न करतील, अशा चर्चा तेव्हा व्हायच्या. मात्र, त्यांच्या दोघांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.
भांडण झाल्यानंतर ऐश्वर्या सलमान पासून वेगळी झाली. पुढे काही काळ तिचं नाव अभिनेता विवेक ओबेरॉयसोबतही जोडलं गेलं. यामुळे विवेक आणि सलमानचे झालेले वाद तर प्रचलित आहेत. मात्र, ऐश्वर्याने आयुष्यभराच्या साथीसाठी तिसऱ्याचीच निवड केली.तिने अभिषेक बच्चन सोबत लग्न करत संसार थाटला. तर, सलमान अजूनही सिंगल आयुष्य जगत आहे.
अशात सलमानचा (Salman Khan) एक कीस करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता चाहत्यांना वाटत असेल की, सलमानसोबत कीस करणारी अभिनेत्री ऐश्वर्याच असेल,पण असं काही नाहीये. सलमानने नेहमीच चित्रपटात काम करताना ‘नो किस पॉलिसी’चं पालन केलंय. मात्र, त्याने ऐश्वर्या किंवा इतर कोणत्याही नाही तर फक्त एका अभिनेत्रीसोबत ही पॉलिसी तोडली आहे.
‘या’ अभिनेत्रीला केलंय सलमानने कीस
सलमान खानने (Salman Khan) ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी आणि कॅटरिना कैफ यांसारख्या काही अभिनेत्रींना डेट केलंय. परंतु जेव्हा ऑनस्क्रीन कीस करण्याचा विषय आला तेव्हा त्याने 90 च्या दशकातील एका अभिनेत्रीशिवाय कुणालाही कीस केलं नाहीये. सनी देओलच्या ‘जीत’ या चित्रपटात भाईजानने करिअरमधील पहिला किसिंग सीन दिला होता.
सनी देओल स्टारर ‘जीत’ या चित्रपटात करिश्मा कपूरसोबत सलमान खानचा एक छोटासा किसिंग सीन आहे. सोशल मीडियावर सलमान खानचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करिश्मा कपूर त्याचे चुंबन घेताना दिसत आहे, जो 1993 मध्ये आलेल्या ‘जीत’ चित्रपटातील एक सीन आहे.
Salman का पाळतो ‘नो किसिंग पॉलिसी’?
सलमान खानने (Salman Khan) आजपर्यंत आपली नो किसिंग पॉलिसी कायम ठेवली आहे. यामागचं कारण त्याने स्वतः सांगितलं आहे. सलमान खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, लहानपणी आम्ही कुटुंबासोबत इंग्रजी चित्रपट पाहायचो, पण जेव्हा कधी किसिंग सीन यायचा तेव्हा सगळेच अस्वस्थ व्हायचे. सलमान पुढे म्हणाला, माझा चित्रपट पाहताना माझ्या चाहत्यांना असे वाटू नये असं मला वाटतं.
आपल्या नो किसिंग पॉलिसीबाबत सलमान खान पुढे म्हणाला की, मी नेहमीच कुटुंबासाठी चित्रपट बनवतो. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र चित्रपट पाहतं तेव्हा मला ते आवडतं, म्हणून मी किंसिंग सीन करत नाही जेणेकरून चित्रपट पाहताना अस्वस्थ होऊ नये.
News Title – Salman Khan broke no kissing policy for Karisma Kapoor
महत्वाच्या बातम्या-
“काय समज द्या, समज द्या लावलंय”; भुजबळांनी भाजप नेत्यांना सुनावलं
निकालापूर्वीच मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; थेट म्हणाले..
अनंत-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांसाठी असणार खास ‘ड्रेसकोड’; लग्नपत्रिका आली समोर
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने घेतला मोठा निर्णय!
पुणे अपघाताला नवं वळण; आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा