“बर्थडे मुबारक हो कप्तान साहब…”; MS धोनीच्या वाढदिवशी सलमान खानची खास पोस्ट

Salman Khan Celebrated MS Dhoni Birthday

MS Dhoni Birthday | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा आज 7 जुलैरोजी वाढदिवस आहे. चाहत्यांसह अनेक दिग्गजांकडून त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. बॉलिवुड स्टार सलमान खानने देखील धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नाही तर, त्याने धोनीच्या बर्थडे सेलिब्रेशनला हजेरी देखील लावली.

माहीसोबतचा एक फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. धोनीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. धोनी केक कापत असताना साक्षी त्याच्या बाजूला उभी आहे. यानंतर तिने धोनीला केक भरवला. यावेळी सलमान खान देखील उपस्थित होता.

सलमान खानने दिल्या धोनीला शुभेच्छा

अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर धोनीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने वाढदिवसाचा फोटो शेअर करत ‘बर्थडे मुबारक हो कप्तान साहब…’, असं लिहिलं आहे.सलमानच्या या पोस्टवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

धोनीची पत्नी साक्षी हीने देखील एक व्हिडिओ पोस्ट केलाय. साक्षीने पती महेंद्रसिंग धोनीला त्याच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त स्पेशल केक दिला. धोनीने केक कापला तेव्हा सलमान खानने साक्षी धोनीला (MS Dhoni Birthday) आधी तो खायला सांगितला. यानंतर माहीने भाईजानचे तोंड गोड केले. याशिवाय माहीच्या वाढदिवसाला अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh (@sakshisingh_r)

MS धोनीने साजरा केला 43 वा वाढदिवस

दरम्यान, धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 टी-20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तसेच, धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय (MS Dhoni Birthday) संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर-1 राहिला आहे.

धोनीच्याच नेतृत्वात भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 देखील जिंकली होती. याशिवाय महेंद्रसिंग धोनीची गणना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याने चेन्नई सुपर किंग्जला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. आज धोनीच्या वाढदिवशी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

News Title – Salman Khan Celebrated MS Dhoni Birthday

महत्त्वाच्या बातम्या-

‘हिट अँड रन’ च्या घटनेने मुंबई हादरली; गाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू, चालक फरार

पहाटे फक्त 20 मिनिटे चालण्याने काय होईल?, उत्तर ऐकून हैराण व्हाल

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानची ‘अशी’ अवस्था पाहून चाहत्यांना धक्का!

ठरलं! ‘या’ तारखेला मांडलं जाणार देशाचं बजेट; सर्वसामान्यांसाठी होणार मोठ्या घोषणा?

“सरकारला रोष परवडणार नाही, मराठ्यांना कमजोर समजू नका”; जरांगे पाटील यांचा इशारा

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .