माओवाद्यांच्या धमक्या; सलमान खानचा शो केला रद्द

मुंबई | बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानचा ‘दा-बंग टूर टू नेपाल’ हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. विक्रम चंद विप्लवच्या माओवादी संघटनेच्या धमक्यांमुळे सलमानला हा शो रद्द करावा लागला आहे.

10 मार्चला सलमान नेपाळ दौऱ्यावर त्याच्या नविन कार्यक्रमासाठी जाणार होता. आयएनएस काठमांडूच्या वृत्तानुसार, या कार्यक्रमात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा, कृती सिनन, प्रभुदेव, मिंट ब्रदर्स आणि मनीष पाल उपस्थित राहणार होते.

या शोमध्ये नेपाळच्या पर्यटनाला चालना देणार होते.  यानंतर हा शो भारतातील अनेक शहरांमध्ये होणार आहे, त्यात मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता या शहरांचा देखील समावेश आहे.