मोठी बातमी! भाईजानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीच्या फोटोने खळबळ

Salman Khan | बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना काल (19 सप्टेंबर) फरार गुंड लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊन धमकी देण्यात आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता धमकी देणाऱ्या महिलेचा फोटो समोर आला आहे.या फोटोमध्ये महिलेने बुरखा घातला असून ती महिला बॉयफ्रेंडसोबत स्कूटीवर बसलेली दिसत आहे. समोर आलेल्या फोटोत धमकी देणाऱ्या महिलेचा चेहरा बुरख्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये. (Salman Khan)

मात्र, महिलेच्या बॉयफ्रेंडचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. सलीम खान जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्याचवेळी त्यांना धमकी देण्यात आली. याची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. आता या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

सलीम खान यांना धमकी देणाऱ्या महिलेचा फोटो समोर

काही मीडिया रिपोर्टनुसार, गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी सलमान खानच्या वडिलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षापासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून जीवे मारण्याचा धमक्या येत आहेत. यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली. (Salman Khan)

नेमकं प्रकरण काय?

झालं असं की, काल सकाळी सलीम खान हे मॉर्निंग वॉकसाठी बँडस्टँड परिसरात गेले होते. त्याचवेळी स्कूटरवरून आलेल्या एका व्यक्तीने आणि बुरखा घातलेल्या महिलेने त्यांना धमकी दिली. एक अनोळखी महिला त्यांच्याकडे आली आणि लॉरेंस बिश्नोई को भेजूं क्या? असे विचारत तिने त्यांना थेट धमकी दिली. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

याआधीही सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्या देण्यात आल्या होत्या. वांद्रे पश्चिम येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमबाहेर मागे गोळीबार देखील झाला होता. आता सलीम खान यांना धमकी दिल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्कूटर चालविणाऱ्याला अटक केली असून फरार महिलेला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली आहे. (Salman Khan)

salim khan

मुंबई पोलीस या प्रकरणाचा विविध अँगलने तपास करत आहेत.  याप्रकरणी मुंबई पोलीस आता सतर्क झाले आहेत. यापूर्वी सलमानच्या घराबहेर झालेला गोळीबार त्यानंतर सलीम खान यांना थेट धमकी देण्यात आल्याने खान कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

News Title : Salman khan father threatened case women photo viral

महत्वाच्या बातम्या –

ठाकरे की शिंदे?, यंदा शिवाजी पार्कवर कोण गाजवणार दसरा मेळावा?

सोनं स्वस्त झालं की महाग?, सराफा बाजारात काय आहेत सध्या दर?

वृषभसह आज ‘या’ 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, धनलाभाचे संकेत

विधानसभेपूर्वीच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?, कधी आणि किती रुपयांची होणार घसरण?

प्रेम, पद, पैशांचा मार्ग होणार मोकळा; ‘या’ राशींचे येणार अच्छे दिन