Salman Khan Firing | सलमान खानच्या (Salman Khan Firing) गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबाराविषयी मोठी अपडेट समोर आलीये. सलमान खानच्या (Salman Khan Firing) गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला. हा गोळीबार रविवारी पहाटे सकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी करण्यात आला. त्यावेळी चार ते पाच राऊंड फायर करण्यात आल्या. त्यानंतर लगेचच घटनास्थळी पोलीस तैनात झाले. त्याच्या घराबाहेर कडक बंदोबस्त आहे. दरम्यान सलमानच्या गोळीबाराचं (Salman Khan Firing) सर्व प्लॅनिंग कुठं रचण्यात आलं याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीये. (Salman Khan Firing)
फायरिंगचा कट अमेरिकेत रचला
फायरिंगचा हा कट अमेरिकेत रचला गेल्याची माहिती समोर आली आहे. वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून शूटर्सला गोळीबाराची माहिती देण्यात आली असल्याचं कळतंय. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने ही धुरा हाती घेतली आहे. अनमोल बिश्नोईने फायरिंगची जबाबदारी ही रोहित गोदरा याच्याकडे दिली. गोदराकडे 12 हून अधिक प्रोफेशनल शूटर्स होते. गोदरा हा अमेरिकेत असला तरीही त्याच्याकडे इतर अनेक शूटर्स आहेत.
गोळीबाराची जबाबदारी घेणाऱ्याचा आयपी ॲड्रेस हा कॅनडातील असल्याची माहिती समोर आलीये. पोलिसांकडून या अकाऊंटची माहिती काढण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे.
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईचा गोळीबारामागे हात आहे. बिश्नोईच्या गँगमधील काहींनी हा गोळीबार केला. गोळीबार करण्याचं कारण समोर आलं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनंतर मुंबईवर राज्य करण्यासाठी हा गोळीबार केल्याचं सांगण्यात आलंय. अभिनेता सलमान खान हा व्हीआयपी आहे. म्हणून त्याच्या घराबाहेर गोळीबार केला.
पाच राज्यात तपास सुरू
सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाच राज्यातून पोलिसांचा तपास सुरू आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, आणि पंजाब पोलिसांकडून हा तपास सुरू आहे.
News Title – Salman Khan Firing Big News Update
महत्त्वाच्या बातम्या
वरुण धवनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!
मारुती सुझुकी लवकरच बाजारात धुमाकूळ घालणार; ग्राहकांना मिळणार भन्नाट फीचर्स
कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु; या तारखेपर्यंत करा अर्ज
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल
Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना