Salman Khan Firing | बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान (Salman Khan Firing) याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर 14 एप्रिल रोजी धक्कादायक प्रकार घडला. काही आरोपींनी घराबाहेर गोळीबार केला. त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं. त्यांच्यासोबत देशातील काही राज्यातून इतर आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलंय. सलमान खान गोळीबार प्रकरणातील अनेक आरोपींना अटक करण्यात आलीये. त्यातील एका आरोपीने जेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यामध्ये काही तरी कट असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्यानं केलं आहे. (Salman Khan Firing)
ठाकरे गटाच्या नेत्याचा धक्कादायक दावा
दरम्यान, सलमानच्या घराबाहेर गोळीबार (Salman Khan Firing) करण्यात आला होता. त्याप्रकरणी देशभरातून गुन्हेगारांचं कनेक्शन बाहेर आलं. तसेच सलमान खान गोळीबार (Salman Khan Firing) प्रकरणी एका आरोपीने जेलमध्येच फाशी घेतली. यावरून हा एक कट असल्याचं ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी म्हटलं आहे.
आत्महत्या केलेल्या आरोपीचं नाव हे अनुज थापन असं होतं. त्याला पंजाबमधून अटक करण्यात आली होती. बुधवारी (1 मे) रोजी तुरुंगात चादरीने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचं उघडकीस आलं. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेल्या गुन्हे शाखेच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर आरोपी अनुप थापनला ठेवण्यात आलं होतं. यावर ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी यामागे पोलीस अधिकारी आणि राजकीय नेता देखील असू शकतो असा दावा केला आहे.
पोलीस अधिकाऱ्याचा हात?
वृत्तानुसार, मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कोठडीत आरोपीला ठेवलं होतं. गुन्हे शाखेच्या कोठडीतच त्या आरोपीचा मृत्यू झाला. या घटनेत मोठा राजकीय नेता किंवा पोलीस अधिकाऱ्याचा हात असू शकतो, अशी शंका दुबे यांनी व्यक्त केलीये. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे असतात. तिथे इतर अधिकारी असतात. अशा ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडणं म्हणजे एक प्रकारचा कटच असू शकतो, असा दावा दुबे यांनी केला आहे.
याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या वतीने घडलेल्या घटनेचं प्रकरण गांभिर्याने घ्यावं, असं दुबे म्हणालेत. एवढंच नाहीतर अनुजचा मृतदेह मुंबईबाहेर शवविच्छेदनासाठी पाठवावा अशी मागणी अनुजचा भाऊ अभिषेकने केली. त्याने आत्महत्या केली नाही. त्याला न्याय मिळवून द्या, असं तो म्हणाला.
अनुज हा शौचालयातून बराच वेळ झाला बाहेर येत नव्हता. त्याला वारंवार हाक मारूनही तो बाहेर आला नाही. पोलिसांनी तेव्हा बळजबरीने शौचालयाचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याने गळफास घातल्याचं दिसलं. त्याला तातडीने गोकुळदास रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
News Title – Salman Khan Firing Case News Update
महत्त्वाच्या बातम्या
बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना नरेंद्र मोदी भावूक; म्हणाले…
‘तो जिवंत आहे’; सिद्धू मुसेवाला प्रकरणी पोलिसांचा खुलासा
‘पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती…’, चित्रा वाघ यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
‘आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही…; उद्धव ठाकरे संतापले
‘या’ तीन बँका करतील मालामाल; एका वर्षाच्या FD वर देतात तगडं व्याज