Salman Khan Firing | बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच अभिनेता सलमान खानला धमकीचे फोन, मेसेज येतात. दरम्यान 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला. हा गोळीबार लाॅरेन्स बिश्नोईच्या गँगमधील टोळक्यांनी केला. या गोळीबारानंतर मोठी खळबळ उडाली. यानंतर काही तासांमध्ये हल्लेखोरांना अटकही करण्यात आली. यामुळे सलमानच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. (Salman Khan Firing)
सलमानवर अल्पवयीन मुलाकडून गोळीबार
अभिनेता सलमान खानवर (Salman Khan Firing) हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येणार होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पनवेल पोलिसांनी याबाबतीत तपास केला. हेच नाही तर अत्याधुनिक बंदुकांचा वापर करून सलमानवर अल्पवयीन मुलाकडून गोळीबार करण्याचा कट रचण्यात आलेला.
हा गोळीबार करण्यासाठी बिश्नोई गँग ही अल्पवयीन मुलाचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना केलेल्या नियोजनानुसार सलमानवर हल्ला करून पळून जाण्याचा प्लॅनही केला होता. लाॅरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई हा त्यांना पळून जाण्यात पूर्ण मदत करणार होता, असा खुलासा देखील करण्यात आला.
पनवेल पोलिसांनी कट उघडकीस आणला
पनवेल पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट उघडकीस आलाय. या सर्व कामात फक्त बिश्नोई गँग नाही तर कुख्यात गँगस्टर आनंद पाल यांची हत्या झाल्यानंतर त्यांची गँग चालवणारी मुलगी चिनू ही या सगळ्यात मदत करत असल्याचं समोर आलंय. (Salman Khan Firing)
यावरून एक माहिती समोर आली. सलमान खानला (Salman Khan Firing) मारण्याचा पहिला कट फसला गेला. तसेच लाँरेन्स बिश्नोईला मारण्यासाठी दुसरा कट आखण्यात येत आहे. यामुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
ज्यादिवशी सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सलमानच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली आहे.
News Title – Salman Khan Firing News Update
महत्त्वाच्या बातम्या
निकालाआधीच झळकले नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर
दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ST महामंडळात ‘इतक्या’ पदांची भरती सुरू
Heat Stroke ते अॅसिडिटीपासून ‘या’ समस्यांवर लाभदायक आहे जलजीरा; जाणून घ्या रेसिपी
ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीचा श्वेता बच्चनला येतो राग; सर्वांसमोर केला खुलासा
कोल्हापूरातील भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, कारने चौघांना उडवलं