मुंबई | अभिनेता सलमान खान इंस्टाग्रामवर फक्त 2 मुलींना फॉलो करतो. इसाबेल कैफ म्हणजेच कॅटरीना कैफची सख्खी बहीण आणि कूकीज विकून गरजूंना पैसे देणार्या मुलीला सलमान खान फॉलो करतो.
कूकीज विकून गरजूंना पैसे देणार्या मुलीसोबत सलमानने काही दिवसापूर्वी फोटो शेअर केला होता, मात्र कॅटरीना कैफची सख्खी बहीण इसाबेल कैफला सलमान का फाॅलो करत असेल? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
सलमान आणि कॅटरिना हे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. अजूनही त्या दोघांनी आपल्या रिलेशनशीपबद्दल काहीही स्पष्ट केलं नाहीये.
Comments are closed.