Salman Khan l दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मात्र या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई या गँगचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता बॉलिवूड स्टार सलमान खान संदर्भात एक मोठी माहिती मिळाली आहे. सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने तब्बल 25 लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा :
बाबा सिद्दीकी यांच्यानंतर सलमान खान हा बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. कारण माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देखील देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सलमान खानला मारण्यासाठी बिष्णोई टोळीने तब्बल 25 लाख रुपयांची सुपारी घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या हत्येचा बिश्नोई गँगचा मोठा प्रयत्न होता. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर देखील गोळीबार करण्यात आला होता. सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र देखील दाखल केले होते.
Salman Khan l तब्बल 25 लाखांची सुपारी :
मात्र आता बिश्नोई गँगने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात देखील म्हटलं आहे. अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी आरोपींनी पाकिस्तान येथून AK 47, AK 92 आणि M 16 ही आधुनिक शस्त्रे विकत घेण्याची योजना देखील आखली होती.
याशिवाय ज्या बंदुकीने पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या केली होती, अगदी त्याच तुर्कीने बनावटीच्या जिगना हत्यारने आरोपी सलमान खानला मारण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय आरोपी हे सलमान खानच्या हालचालींवर देखील पाळत ठेवून होते. तसेच यासाठी अनेक जण तैनात देखील करण्यात आले होते.
News Title : Salman Khan Home Firing Case
महत्वाच्या बातम्या –
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी जाहीर केलं बड्या नेत्याचं नाव
वरळीमध्ये रंगणार हायप्रोफाईल सामना, महायुतीची मोठी खेळी?
मोठी बातमी! समीर वानखेडे ‘या’ पक्षाकडून विधानसभा लढवणार?
पुण्यात बड्या व्यावसायिकाच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त