Salman Khan l बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेमागील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईविरोधात मुंबई पोलिसांना सर्वात मोठा पुरावा मिळाला आहे. आरोपींकडून सापडलेले अनमोल बिश्नोईचे ऑडिओ रेकॉर्डिंग एजन्सीकडे ठेवलेल्या अनमोल बिश्नोईच्या ऑडिओ नमुन्याशी जुळले आहेत.
पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले :
गोळीबाराची घटना घडल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी गुजरातमधून विकी गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तपासादरम्यान, अनमोल बिश्नोई गोळीबार केल्यापासून ते लपून राहण्यापर्यंत सतत गोळीबार करणाऱ्यांच्या संपर्कात होताअ से उघड झाले असून त्याच्या आणि अनमोल बिश्नोई यांच्यातील संभाषणाचे ऑडिओ त्याच्या मोबाईलवरून पोलिसांना मिळाले होते .
एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा ऑडिओ अनमोल बिश्नोईचा आहे की अन्य कोणाचा, हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडून अनमोल बिश्नोईचे ऑडिओचे नमुने घेण्यात आले आणि दोन्ही नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. तपासादरम्यान फॉरेन्सिक लॅबला कळाले की हा ऑडिओ फक्त अनमोल बिश्रोईचा आहे.
Salman Khan l अनुज थापनने तुरुंगात आत्महत्या केली :
26 एप्रिल रोजी पोलिसांनी अनुज कुमार थापन आणि सोनू चंदर यांना पंजाबमधून दोन्ही शूटर्सना बंदूक पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनुज थापनने 1 मे रोजी तुरुंगात आत्महत्या केली होती. यानंतर पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरी याला अटक करण्यात आली.
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी बाईकवर आलेल्या काही लोकांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडवून आणली होती. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
News Title – Salman Khan House Firing Case
महत्त्वाच्या बातम्या
अगदी वरचा देव जरी आला तरी… उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड
ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनेज’ होती; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
ओबीसींसाठी महत्वाचा दिवस; लक्ष्मण हाकेंच्या भेटीला ‘हे’ मोठे मंत्री जाणार
या राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा…
लक्ष्मण हाकेंचं उदाहरण देत पंकजा मुंडेंचा जरांगेंना टोला, म्हणाल्या…