सलमान खान ‘या’ प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात ?

मुंबई | बाॅलिवूडचा(Bollywood) भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान(Salman Khan)नेहमीच चर्चेत असतो. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनयानं त्यानं सर्वांची मन जिंकली आहेत. त्यामुळं त्याचे असंख्य चाहते आहेत.

सलमान खाननं अजूनही लग्न न केल्यानं बऱ्याचदा नेटकरी त्याला ट्रोल करत असतात. आतापर्यंत त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. त्याच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटादरम्यान त्याच्यात आणि ऐश्वर्या रायच्यात झालेलं प्रेम आणि नंतर झालेली भांडणं अजूनही काहीजण विसरू शकले नाहीत.

अशातच आता सलमान पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. सलमान प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री पूजा हेगडेला(Pooja Hegde) डेट करत आहे, अशा बातम्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तसेच ते बराच वेळ एकत्र घालवत आहेत, असंही म्हणलं जात आहे.

या चर्चेला कारणही खास आहे. सलमान-पूजाच्या नात्यावर चित्रपट समिक्षक असलेल्या उमेर संधू यांनी एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात पडला आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसने पूजाला पुढच्या दोन चित्रपटांसाठी साईन केलं आहे. ते सोबत वेळ घालवत आहेत. ही माहिती सलमानच्या जवळच्या व्यक्तीकडून निश्चित केली आहे.

उमेरचे हे ट्विट पाहताच सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि मीम्स व्हायरल होत आहेत. उमेरनं यापूर्वी प्रभास आणि क्रितीच्या नात्याबद्दलही असंच ट्विट केलं होतं. परंतु सलमान-पूजाबद्दल त्यानं देलेली ही माहिती खरंच खरी आहे का, हे अजून अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

दरम्यान, सलमान-पूजा यावर काय स्पष्टीकरण देतील, याकडं चाहत्यांच लक्ष लागलं आहे. पूजा सलमानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकणार आहे

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More