Salman Khan l गेल्या काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. मात्र या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अभिनेता सलमान खानला वारंवार धमकी येत आहे. अशातच आता लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने सलमान खानला धमकी दिली आहे.
मुंबई पोलीस अलर्ट मोडवर :
यावेळी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने धमकी देत अभिनेता सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज देखील आला आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाठवला आहे.
वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये मी लारेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत असल्याचं सांगत थेट धमकी देण्यात आली आहे. कारण आता अभिनेता सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं दिसून येत आहे. कारण सलमान खान काळवीट शिकार प्रकरणामुळे हे प्रकरण घडत आहे.
Salman Khan l अभिनेता सलमान खानला धमकी :
अशातच आता वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये असा दावा करण्याता आला आहे की, संबंधित व्यक्ती ग लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. तसेच धमकीच्या मेसेजमध्ये असं लिहिलं आहे की, ‘अभिनेता सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, किंवा तब्बल पाच कोटी रुपये द्यावे. असे न केल्यास आम्ही सलमान खानला जीवे मारू.
याशिवाय आमची गँग आज देखील सक्रिय आहे’. असा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध सध्या मुंबई पोलिस घेत आहेत.
News Title : Salman Khan Lawrence Bishnoi Death Threat
महत्वाच्या बातम्या –
फडणवीसांनी ईडीचा डाव लावताच गोपाळरावांचा आव, ताव आणि भाव कोसळला!
बॉलीवूडवर शोककळा! ‘गदर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप
“मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते, हीच का लाडकी बहीण योजना?”
आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येणार!
कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; सतेज पाटलांना मोठा धक्का