“शूटिंग सुरु असताना मी सलमानला बाजूला घेऊन गेले आणि”,’या’ अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा

Salman Khan | बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असतो. एवढंच नाही तर, सलमान खान आणि ऐश्वर्याच्या अफेरच्या चर्चा आज सुद्धा चांगल्याच रंगताना पहायला मिळतात.

90 च्या दशकात सलमान खानने केलेले सर्व चित्रपट बाॅक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करायचे. पण त्याला खरी लोकप्रियता ‘मैने प्यार किया’ या सिनेमामधून मिळाली. दरम्यान, शूटिंगच्या वेळेस सलमान खानने चित्रपटातील अभिनेत्रीला त्रास दिल्याचं म्हटलं जात आहे. याबद्दल स्वतः अभिनेत्री भाग्यश्रीने धक्कादायक खुलासा केला आहे.

काय म्हणाली भाग्यश्री?

चित्रपट रिलीज झाल्यानंतर भाग्यश्रीनेे एका मुलाखतीत सलमान खानचे (Salman Khan) काही किस्से सांगितले. यावेळी भाग्यश्री म्हणाली की, जेव्हा आम्ही सिनेमाचं शुटिंग करत होतो, त्यावेळेस सलमान सतत माझ्या जवळ येऊन बसायचा आणि कानात सारखं एकच गाणं गायचा. दिल दिवाना बिन सजना के आमच्या या सिनेमातलं गाणं तो माझ्या कानात येऊन गुन गुनायचा.

“मी त्याला बाजूला घेतलं”

पुढे ती म्हणाली की, जेव्हा सलमान (Salman Khan) हे गाणं बोलायचा तेव्हा माझी फार चिडचिड व्हायची. त्यानंतर मी सलमानला बाजूला घेतले आणि त्याला विचारले की हे सर्व काय आहे, तो असं का करतोय? तेव्हा सलमानने मला सांगितलं की त्याला सर्व काही माहित आहे, तर मी विचारलं की तुला काय माहित आहे, ज्यावर तो म्हणाला की त्याला हिमालयबद्दल माहिती आहे. खरंतर त्याला माझं आणि हिमालयचं अफेअर एका कॉमन फ्रेंडकडून समजलं होतं.

News Title : salman khan memories were shared by actress bhagayshri

महत्त्वाच्या बातम्या-

युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवार भावूक; नेमकं काय म्हणाले?

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरचे वडील ‘या’ भागातून निवडणूक लढवणार

एकही जागा न मिळाल्याने आठवले महायुतीत नाराज?, रिपाई स्वबळावर लढणार?

घरातील ‘या’ तीन वस्तू फेकून द्या; दिवाळीला होईल भरभराट

पुढील चार, पाच दिवस ‘या’ भागात पाऊस हजेरी लावणार!