सलमानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी

Salman Khan l दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेला जवळपास आठवडा होत आला आहे. मात्र या घटनेमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचं उघडकीस आलं आहे. मात्र आता लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला देखील धमकी दिली आहे.त्यामुले सलमानच्या सुरक्षेत कडकोट वाढ करण्यात आली आहे.

सलमान खानला पुन्हा धमकी! :

अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावे पुन्हा धमकी देण्यात आली आहे. मात्र आता सलमान खानसोबत असलेले भांडण संपवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगने तब्ब्ल 5 कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच अभिनेता सलमान खानकडे 5 कोटींची मागणी करणारा हा धमकीचा मेसेज मुंबई ट्राफिक पोलिसांना मिळाला आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या तर्फे आपण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

यासंदर्भांत अधिक माहिती अशी की, ट्रॅफिक पोलिसांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे एक मेसेज पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये असं नमूद केलं आहे की, लॉरेन्स बिश्नोईसोबतचं वैर संपवण्यासाठी समलान खानकडून 5 कोटी मागितले आहे. तसेच हा मेसेज हलक्यात घेऊ नका, अन्यथा सलमान खानची अवस्था देखील बाबा सिद्दीकींपेक्षा खूप वाईट होईल असा थेट इशारा या धमकीच्या मेसेजमध्ये देण्यात आला आहे. मात्र आता सलमान खानला आलेल्या या मेसेजमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून सुरक्षा एजन्सींमध्ये देखील चिंता वाढली आहे.

Salman Khan l सलमान खानच्या सुरक्षेत वाढ :

सलमान खानला धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी जवळपास 100 मुंबई पोलिसांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. वांद्र्यातील सलमान खानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’ बाहेर देखील तब्बल 24 तास पोलिसांचा पहारा देण्यात आला आहे.

याशिवाय सीसीटीव्हीच्या मदतीने देखील सुरक्षेवर कडक नजर ठेवली जात आहे. तसेच बँडस्टँड आणि गॅलेक्सी अपार्टमेंट्सजवळ 60 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

News Title – Salman khan received threat again from Lawrence Bishnoi gang 

महत्त्वाच्या बातम्या-

उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपला मोठा धक्का!

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

‘या’ अभिनेत्रीसाठी अभिषेकने ऐश्वर्याला फसवलं?, खळबळजनक माहिती समोर

अजित पवारांना धक्क्यावर धक्के; आधी 600 आता तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा?

नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!