मुंबई | नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीची समीकरणं बदलली आहेत. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या मराठी सिनेमाचा रिमेक हिंदीमध्ये ‘धडक’ म्हणून करण्यात आला. आता सैराट पाठोपाठ तमाम मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणखी एका सिनेमाचा रिमेक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहेत.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा मराठी सिनेमा रिमेक करणार असल्याची माहिती मिळतेय. प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या सिनेमाचा रिमेक करणार आहेत. 2018मध्ये प्रदर्शित प्रचंड गाजलेल्या ‘मुळशी पॅटर्न’चा आता हिंदीमध्ये रिमेक होणार आहे.
मुळशी पॅटर्न या सिनेमाच्या हिंदीमधील रिमेकमध्ये सलमान खान हा सहाय्यक भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये साकारलेल्या पोलिसाची भूमिका सलमान खान रिमेकमध्ये करणार असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा गँगस्टारच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण अद्याप या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
ट्रेंडिंग बातम्या-
“अटकेपासून वाचण्यासाठी बाळासाहेबांनी आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवल्ली केली होती”
बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसे देणार बक्षिस!
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! आप नेत्याच्या घरावर सापडले पेट्रोल बाॅम्ब, गावठी कट्टे, दगडांचा साठा
अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे- सुशीलकुमार शिंदे
‘सोशल मीडिया’त मराठीच्या वापरात हजार टक्क्यांनी वाढ
Comments are closed.