मनोरंजन

कतरिनानं दिलेली ‘ही’ गोष्ट आजही सलमान वापरतो!

मुंबई | अभिनेता सलमान खानने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्याच्या स्टायलिंग सेन्सवर गप्पा मारल्या. मी अनेक आर्टिकल पाहिलेत ज्यामध्ये महिलांच्या ड्रेसवर सर्कल करून असं सांगितलं जातं की हिने या कार्यक्रमात हे कपडे घातले होते आणि आता हुबेहूब तसाच ड्रेस या कार्यक्रमात घातला आहे, असं सलमानने सांगितलं.

जर हे असं ते माझ्यासोबत करू लागले तर हे त्यांना सगळीकडेच करावं लागेल. कारण मी आजही ते शूज वापरतो. जे मी 5 वर्षांपूर्वी घातले होते, असं सलमानने मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं.

माझं एक शर्ट 500 रुपयांचं असतं आणि ते मी अनेक वर्ष वापरतो. यात चुकीच काहीही नाही. माझे बेल्ट 20 वर्ष जुने आहेत. कतरिनाने काही वर्षांपूर्वी दिलेला बेल्ट मी आजही वापरतो, असं सलमानने म्हटलं आहे.

दरम्यान, सलमान खानचा दबंग 3 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या धमाकेदार अवतारात दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या