बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मैने प्यार किया’च्या यशामागचं क्रेडिट लक्ष्मीकांत बेर्डेंना- सलमान खान

मुंबई | ‘मैने प्यार किया’ चित्रपटाच्या यशामागे मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेंचा मोलाचा वाटा आहे, असं अभिनेता सलमान खानने म्हटलं आहे.

सलमानने काही दिसांपूर्वी एका डान्स शोच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्याने लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतच्या आठवणी ताज्या केल्या आणि तो भावूक झाला.

‘साजन’ चित्रपटातील ‘तुमसे मिलने की तमन्ना है’ या गाण्याच्या माझ्याकडे खूप आठवणी आहेत. या गाण्यात माझ्यासोबत लक्ष्मीकांत होते. मी त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे आमची मैत्री घट्ट झाली होती, असं सलमान खानने म्हटलं आहे.

दरम्यान, ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट मला लक्ष्मीकांतच्या आठवणींत घेऊन जातो, असं सलमानने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-राहुल गांधींनी राजीनामा देण्याची गरजच काय?; या नेत्याने केली पाठराखण

-पराभवानंतरही कन्हैया कुमारचा जोश कायम; म्हणतो…

-पराभवानंतरही महाराष्ट्रातल्या ‘या’ नेत्याला मिळणार मंत्रीपद!

-मंत्रीपदासाठी शिवसेनेकडून ‘ही’ नावं चर्चेत!

-जिंकलो नसलो तरी अजून मी हरलो नाही!; शरद पवारांची भावनिक पोस्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More