सलमानच्या हेल्थवरून चाहते चिंतेत? व्हिडिओ पाहून तुमचंही वाढेल टेन्शन

Salman Khan Viral Video l बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खानने मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सलमान नेहमीप्रमाणे आपल्या कॅज्युअल लूकमध्ये कार्यक्रमाला पोहोचला होता. यावेळी या कार्यक्रमातील त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशातच या कार्यक्रमातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सलमानच्या चाहत्यांची चिंता वाढली :

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सलमान खान आणि त्याची बहीण अलविरा खान मल्होत्रासोबत गेले होते. यावेळी सलमानने स्टेजवर डान्स केला, गाणे गायले आणि मुंबई पोलिसांनीही त्याचे स्वागत केले. अशातच आता सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला ज्याने त्याच्या चाहत्यांच टेन्शन वाढलं आहे.

या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, सलमान खान सर्वांसोबत सोफ्यावर बसलेला दिसत आहे. सोनाली बेंद्रे येताना पाहून त्यानी उठण्याचा प्रयत्न केला. पण त्याला उठण्यात त्रास जाणवला आहे आणि हे कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर सोनाली बेंद्रे त्याच्याजवळ आली आणि त्याला मिठी मारली पण हा व्हिडिओ पाहून चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

Salman Khan Viral Video l सलमानच्या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव :

मात्र यावेळी सलमानने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. कारण सलमान खान दुखापतग्रस्त असताना देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं ठरवल्याने नेटकऱ्यांनी त्यांचं भरभरून कौतुक देखील केलं आहे. तसेच सलमानच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत.

एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘अरे देवा… आमचा आवडता अभिनेता म्हातारा होत आहे.’ तर कोणीतरी लिहिलंय, ‘ज्येष्ठ अभिनेते म्हातारे होत आहेत.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘ये यार, तो 58 वर्षांचा आहे. तरीही तो असाच दिसतो, त्याला सलाम. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘आमचे बालपणीचे आवडते नायक वृद्ध होत आहेत… आणि आम्हीही होत आहोत. त्यामुळे लक्षात ठेवा, काहीही कायमचे टिकत नाही.

News Title : Salman Khan Viral Video

महत्त्वाच्या बातम्या-

नताशाने ‘एक्स’ बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप का केला? बॉयफ्रेंडने सांगितलं यामागचं कारण

अमिताभ बच्चनने पत्नीबद्दल केलं अत्यंत मोठे विधान, म्हणाले, कायमच…

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा ही 3 झाडे, पडेल पैशांचा पाऊस

‘या’ अभिनेत्रीसाठी स्वतःच्या मुलाने अजय देवगणच्या कानाखाली काढला जाळ!

फडवणीस शिवरायांचे दुश्मन…; मनोज जरांगे नेमके काय म्हणाले