बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

32 वर्षाच्या करिअरमध्ये सलमान खान पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार!

मुंबई | बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जाणारा भाईजान म्हणजेच ‘सलमान खान’. सलमान नेहमी कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरत असतो. अशातच सलमान खान सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

सलमान खान बॉलिवूडच्या त्या कलाकारांपैकी आहे, ज्यानं विनोदी, अॅक्शन आणि रोमान्स या सर्वच धाटणीचे चित्रपट केले आहेत. आता 32 वर्षांनंतर तो पहिल्यांदाच एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे राजकुमार गुप्ता करणार आहेत. या चित्रपटात सलमान ‘ब्लॅक टायगर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक यांची भूमिका साकारणार आहे.

रवींद्र यांना आजही देशात सर्वात उत्कृष्ट गुप्तहेरांपैकी एक मानले जाते. रवींद्र यांची कथा भारतीय गुप्तहेर इतिहासाची सर्वात शौर्य आणि धक्कादायक कहाणीपैकी एक आहे. राजकुमार यावर 5 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी रवींद्रच्या जीवनावर संशोधन केले आणि पटकथा तयार करुन सलमानला ऐकवली. कथा ऐकल्यानंतर सलमानने चित्रपटासाठी होकार दिला आहे. या दोघांमधील चर्चा अंतिम स्तरावर सुरू आहे. मात्र, सलमानने यावर सही केली की नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, या सिनेमाचं नाव ब्लॅक टायगर नसेल. या सिनेमासाठी नवं नाव शोधलं जाणार आहे. आता पहिल्यांदाच सलमान दुसऱ्या खऱ्या आयुष्यात होऊन गेलेल्या व्यक्तिरेखेवरच्या सिनेमात त्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा आरोप

“भाजप आंदोलन करायला आजही घाबरलं नाही, उद्याही घाबरणार नाही”

‘करीनाला ‘सीते’ची भूमिका करु देणार नाही’, करीना कपूरला धमकी

“राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार”

जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णा हजारेंचं रोखठोक उत्तर; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More