सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप
मुंबई | बाॅलिवूडमध्ये सल्लू भाई नावाने प्रसिद्ध असलेल्या सलमान खानने 90व्या शतकामध्येच त्याच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यानंतर 20व्या शतकात देखील त्याच्या चित्रपटांना लोकांकडून आजही तितकाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो.
सलमान खानच्या प्रेमाचे किस्से नेहमीच लोकांच्या चर्चेत असतात. कधी ऐश्वर्या तर कधी कॅटरिना, सलमान नेहमी त्याच्या गर्लफ्रेंड्समुळे काॅन्ट्रोवर्सीमध्ये असतो. अशातच सलमानची पाकिस्तानी गर्लफ्रेंड आणि बाॅलिवूड अभिनेत्री सोमिया अलीने सलमान आणि तिच्या ब्रेकअपवर मौन सोडलं आहे. 1991 साली सोमिया भारतात आली होती. त्यानंतर तिने ‘यार गद्दार’, ‘तीसरा कौन?’, यांसारख्या बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सोमियाने दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितल्याप्रमाणे तिला कधीच चित्रपटांमध्ये काम करायची रुची नव्हती. तरीसुद्धा तिने बाॅलिवूडमध्ये काम केलं. सोमिया भारतात फक्त सलमान सोबत लग्न करुन संसार थाटण्यासाठी आली होती. मात्र सलमानने तिला फसवल्याचा आरोप तिने या मुलाखती दरम्यान केला.
दरम्यान, ब्रेकअपनंतर भारतात राहण्यासाठी दुसरं कोणतंही कारण उरलं नसल्यानं तिने भारत सोडल्याचं देखील म्हटलं आहे. त्यानंतर, ती शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. तसेच सोमिया आणि सलमानच्या ब्रेकअपला 20 वर्षे होऊन गेली असून 5 वर्षांपासून ते दोघेही एकमेकांसोबत बोलत नसल्याचं सोमियाने सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला पोलिसांनी केली अटक
मुंबईतील ‘ही’ पाच ठिकाणं अत्यंत धोक्याची, काम नसेल तर जाणं टाळा!
फेसबुकला मोठा फटका, कंपनीची ‘ही’ सेवा ठप्प झाल्याने यूझर्सचीही मोठी नाराजी
संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ मंदिर बंद, प्रशासनानं केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन
बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकावरून नव्या वादाला सुरूवात
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.