बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरुखला सपोर्ट करण्यासाठी सलमान धावला, रात्री उशिरा मन्नतवर पोहोचला

मुंबई | देशभरात मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणामुळे पुन्हा एकदा बाॅलिवूड ड्रग्स कनेक्शन उघड झाल्याचं पहायला मिळत आहे. शनिवारी रात्री एनसीबीनं टाकलेल्या धाडीत 12 जणांना अटक करण्यात आलंय. या प्रकरणात आता शाहरुख खानच्या मुलालाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यामुळे सध्या शाहरुख खानच्याही अडचणी वाढल्याचं पहायला मिळतय. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी अनेक मोठमोठे कलाकार समोर आल्याचं दिसतय. अशातच आता शाहरुख खानच्या मदतीला भाईजान धावला आहे. रात्री सलमान खान शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला.

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर रविवारी रात्री सलमान दाखल झाला होता. त्यामुळे बंगल्याबाहेर भरपूर गर्दी पहायला मिळाली. यावेळी सलमानला अनेक प्रश्न करण्यात आले मात्र सलमाननं एकही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता या दोघांमध्ये काय बोलणं झालं असेल याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, एनसीबी चौकशीनंतर आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. त्याला एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. कोठडी सुनावताच त्याचा जामिन अर्जही दाखल करण्यात आला. आज यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. शाहरुखच्या कठिण काळात सलमान धावला असल्यानं त्याच्यांत काय झालं याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. या प्रकरणात आणखी काय होणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राज्य सरकारची अवस्था आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी झाली आहे”

पूरग्रस्तांचे सांत्वन हा तर मुखवटा; फडणवीसांच्या दौऱ्यावरून संजय राऊत म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीनं दुचाकीस्वारास उडवलं, तीन जण जखमी

धक्कादायक! शिवसेना कार्यकर्त्यांनी केली युवासेना पदाधिकाऱ्याला मारहाण

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह ‘या’ सात जणांना तुरूंगाची हवा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More