बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलमानने बिचुकलेला फटकारलं, तर बिचुकले म्हणाला, ‘खड्ड्यात गेला तुझा शो आणि…’

मुंबई | कलर्स वाहिनीवर सुरु असलेला बिग बॉस या रिअॅलिटीला सध्या चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सध्या बिग बॉसचा 15 वा सिजन सुरु आहे. सलमान खान (Salmaan Khan) या शोचं सुत्रसंचालन करत आहे. या आठवड्यात विकेंड का वार या एपिसोडमध्ये सलमान खानने अभिजित बिचुकलेला (Abhijeet Bhichukale) चांगलेचं खडसावले, तर अभिजीतलाही राग अनावर न झाल्याचं पहायला मिळालं.

अभिजीत बिचुकले हा बिग बॉस स्पर्धेमुळे चांगलाच चर्चेत आला. त्याचं आणि देवोलिना यांच्यातील भांडणही चर्चेचा विषय बनला आहे. मागील एपिसोडमध्ये बिचुकले याने देवोलिना अपशब्द वापरले होते. यावरून सलमान खानने बिचुकले याला चांगलचं फटकारलं होतं. त्यानंतर बिचुकलेही संतापून घर सोडून निघाला होता.

सलमान खानने बिचुकलेला तुझ्या घरातल्या कुणाला अशा शिव्या दिल्या तर तुला चालेल का? असं विचारत तुला शेवटचे बजावतो. नाहीतर तुझे केस पकडून तूला घराच्या बाहेर काढेन. किंवा तुला घरात येऊन मारेन, असा इशारा दिला होता. त्यावर बिचुकलेनेही खड्डयात गेला शो, असल्या शोमध्ये राहायचं नाही, असं म्हणत रागारागत घराच्या बाहेर पडताना दिसतो आहे.

दरम्यान, सलामान खानने बिचुकलेला खडे बोल सुनावल्यानंतर बिचुकलेही घराबाहेर गेल्याचं दिसत आहे. मात्र, आता खरचं बिचुकले घराबाहेर पडणार का? कि सलमान त्याला पुन्हा माघारी बोलावणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे. बिग बॉसचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. त्यातच बिचुकलेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद भेटताना दिसतो आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

थोडक्यात बातम्या-

संधी सोडू नका! iPhone 12 Mini वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट

“धनंजय मुंडे यांचाही आमच्या पक्षाला पाठिंबा”, करूणा मुंडेंचा दावा

प्रतिक्षा संपली! सुपरडुपर हिट पुष्पा सिनेमा आजपासून टीव्हीवर पाहता येणार!

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

महिलेच्या केसात थुंकल्याच्या प्रकरणावरून जावेद हबीब यांनी मागितली माफी, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More