बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलमान माझे बूट व कपडे सांभाळायचा, मीच त्याला… जग्गूदादाचा मोठा खुलासा

मुंबई | बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने अनेकांशी पंगा घेतला आहे. पण म्हणून इंडस्ट्रीत त्याचे जिगरी यार काही कमी नाहीत. असे काही लोक आहेत, ज्यांच्यावर भाईजान जीव ओवाळून टाकतो. जग्गू दादा त्यापैकीच एक. जॅकी श्रॉफ व सलमान खान यांची मैत्री आजची नाही. अगदी सलमान मॉडेलिंग करत होता, असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता, तेव्हापासूनची ही मैत्री आहे.

जॅकी श्राॅफ त्यावेळी सुपरस्टार होता आणि सलमान एक नवखा तरूण. जॅकीचे मानाल तर, त्याच्याचमुळे सलमानला पहिला ब्रेक मिळाला. होय, एका ताज्या मुलाखतीत खुद्द जॅकीने हा खुलासा केलायं. सलमानबद्दल तो भरभरून बोलला. त्याची आणि सलमानची पहिली भेट कुठे झाली, हे देखील त्याने या मुलाखतीत सांगितले.

ऐकून आश्चर्य वाटेल पण सलमान जॅकीचे कपडे व बूट सांभाळायचा. जॅकीने सांगितले, सलमान एक मॉडेल होता आणि नंतर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. 1988 साली ‘फलक’ या सिनेमाच्या सेटवर तो माझे कपडे व बूट सांभाळायचा. लहान भाऊ मोठ्या भावाची काळजी घेतो, तशी माझी काळजी घ्यायचा. सलमान असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता, पण मी त्याचे फोटो निर्मात्यांना दाखवायचो, असं देखील जॅकीने सांगितलं.

दरम्यान, अखेर केसी बोकाडिया यांच्या ब्रदर-इन-लॉने सलमानला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून सलमानला स्टारडम मिळाले. मला विचाराल तर माझ्याचमुळे इंडस्ट्रीत त्याला ब्रेक मिळाला होता. मग आमची चांगली मैत्री झाली. आम्ही खूप क्लोज आहोत. एखादा मोठा प्रोजेक्ट आला की तो सर्वप्रथम माझ्या नावाचा विचार करतो, असेही जॅकीने सांगितले.

थोडक्यात बातम्या – 

‘तूफान तो इस शहर में अक्सर आता है’; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

वेड्या आईची वेडी माया!, लेकराला वाचवण्यासाठी गायीची विहिरीत उडी

मोदींविरोधात पोस्टर लावले, पोलिसांकडून 100 जणांना अटक

पत्नीवर संशय असलेला पती करायला गेला एक अन् झालं असं काही की…

36 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीला जाळ्यात ओढलं, तिच्याच बंगल्यावर राहून धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More