सलमानच्या ‘त्या’ एक्सगर्लफ्रेंडवर झाला होता बलात्कार, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आपल्या लव्ह लाइफमुळे नेहमी चर्चेत असतो. आजपर्यंत त्याचं नाव संगीता बिजलानी, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय अशा अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. अशातच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री सोमी अली आता पुन्हा चर्चेत आली आहे. 14 वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक दावा तिने केला आहे. नवभारत टाईम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.
जेव्हा मी पाच वर्षांची होते तेव्हा घरातील नोकराने माझ्यावर तीनदा लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर वयाच्या नऊव्या वर्षी, इमारतीच्या चौकीदाराने माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मी त्यावेळी पाकिस्तानात राहत होते. मग आम्ही अमेरिकेत राहयला गेलो. विकसित देश असूनही तेथे महिलांवर अत्याचार होतात. 14 वर्षाच्या वयात 17 वर्षाच्या एका मुलाने बागेत माझ्यावर बलात्कार केला मात्र समाजाच्या भीतीमुळे मी हे गुपित लपवून ठेवलं असल्याचा गौप्यस्फोट सोमी अलीने केला आहे.
या भयानक अनुभवांमधून सावरल्यानंतर अभिनेत्रीने नो मोर टिअर्स नावाची एक संस्था सुरू केली. जी आज महिलांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी मदत करत आहे. सोमी 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
दरम्यान, सोमी आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्रीने होती. बुलंद, मुंगी, यारा गद्दार, आओ प्यार करे, माफिया अशा बर्याच चित्रपटांमध्ये तिने काम केल आहे. पण तिच्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याशिवाय तिला अभिनयात रस नव्हता. त्यामुळे काही वर्षांतच तिने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं. दरम्यान, ती सलमानची खूप चांगली मैत्रीण होती आणि आज पुन्हा सलमानबरोबर तिच्या खास मैत्रीमुळे ती चर्चेत आहे.
थोडक्यात बातम्या-
एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी ओलांडली आता…- पंकजा मुंडे
“…तर भारतामुळे आशिया कप पुढं ढकलला जाईल”
संजय राठोड यांच्या प्रेमापोटी लोक पोहरादेवीला आले, त्यांनी येऊ नका म्हटलं होतं- उद्धव ठाकरे
…म्हणून चालू पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केला राज ठाकरेंना नमस्कार
“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे महाराष्ट्रावर उपकार केले नाही”
Comments are closed.