बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनला कंटाळून सलून व्यावसायिकाची आत्महत्या; ‘या’ शहरातील धक्कादायक घटना

औरंगाबाद | संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा केली. लाॅकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यातच औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

औरंगाबाद शहरातील सलून व्यावसायिकाने लॉकडाऊनला कंटाळून आर्थिक बोजा वाढत असल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आर्थिक अडचणीमध्ये सापडल्यामुळे औरंगाबाद शहराच्या भोईवाडा परिसरातील विलास उत्तमराव ठाकरे या सलून व्यावसायिकाने हे टोकाचं पाऊल उचललं.

मागच्या वर्षी अनेकांनी नैराश्यातून आत्महत्या केली होती. तसेच कोरोना काळामध्ये काम नाही आणि बँकांचे कर्ज तसेच इतर खर्च मात्र आ.. वासून उभे आहेत. त्यामुळे अनेकांनी या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, औरंगाबादच्या भोईवाडा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. 15 तारखेला लाॅकडाऊन उघडणार अशा आशेवर असणाऱ्या लोकांना मात्र आता 1 जुनपर्यंत लाॅकडाऊन उघडण्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाॅकडाऊन वाढवण्यासंदर्भात एकमत झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

…म्हणून भारतीय संघात भुवनेश्वरला स्थान मिळालं नाही, समोर आलं मोठं कारण!

आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार प्रकरणात CCTV फुटेज व्हायरल ; पाहा व्हिडीओ

लसीसंदर्भात महत्त्वाची बातमी; सीरम, बायोटेक कंपनीकडून मोठी घोषणा

चिंता वाढली! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात म्युकरमायकोसिसचे तब्बल 111 रुग्ण

मंत्रीमंडळाच्या भर बैठकीत जयंत पाटील संतापले, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More