मुंबई | नगरसेवक आणि युवासेना कार्यकारणी सदस्य समाधान सरवणकर यांनी रक्तदान शिबीराचं आयोजन केलं होतं. तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन किंवा पनीर देण्यात येणार असल्याचं म्हटलं. यावरुनच भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली.
राम कदम यांनी केलेल्या टीकेला शिबीराचे आयोजक समाधान सरवणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. समाधान सरवणकर यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाच महत्व काय समजणार?, त्यांची अक्कल तोकडी आहे, असा टोला समाधान सरवणकर यांनी राम कदम यांना लगावला आहे.
दरम्यान, कोव्हिडच्या काळात रक्तदान शिबीर आयोजन न झाल्याने आज महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे याकडे लक्ष वेधून घेत सरवणकर यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.
पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानच महत्व काय समजणार त्याची अक्कल तोकडी आहे कोविद काळात रक्तदान शिबीर आयोजन न झाल्यामुळे आज महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे कृपया नागरिकांनी रक्तदान करा @abpmajhatv @LoksattaLive @ShivSena @zee24taasnews @CMOMaharashtra @saamTVnews
— Samadhan Sarvankar (@samadhan234) December 9, 2020
थोडक्यात बातम्या-
‘रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारायला हवं’; बच्चू कडू भडकले
कोरोना लसीबाबत जो बायडन यांनी केली ‘ही’ मोठी घोषण
वरूण धवन आणि क्रिती सेनॉननंतर ‘या’ अभिनेत्रीला कोरोनाची लागण
रावसाहेब दानवेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…
शिर्डीला जाणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात