भाजपच्या ‘रामा’ला शह देण्यासाठी समाजवादी पार्टीचा ‘कृष्ण’!

गाझिदाबाद | राम केवळ उत्तर भारतापुरते मर्यादित असून भगवान श्रीकृष्ण संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहेत, असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी केलंय. रामापेक्षा कृष्ण जास्त पूजनीय असल्याचंही त्यांचं मत आहे. 

राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या भाजपच्या राजकारणाला शह देण्यासाठी समाजवादी पार्टी आता कृष्णाला पुढं करत असल्याचं कळतंय. सैफईमध्ये भगवान श्रीकृष्णाची 50 फूट उंच मूर्ती बसवण्याच्या हालचालीही समाजवादी पार्टीने सुरु केल्यात.

2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यामुळे सपाचा कृष्ण भाजपच्या रामाला शह देतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.